शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:02 IST

जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाºयांना बसला आहे. जिल्हा परिषद आवारात पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने आणि दिवसभरात अनेक वाहने येथे उभी केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्गात वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय नेते, माजी सदस्य तसेच ठेकेदारांची वाहने जिल्हा परिषद आवारात आणली जातात. त्यामुळे सदर वाहने आत आणणे आणि बाहेर घेऊन जाणे यामुळे वाहनकोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाला सर्वांनाच मदत करावी लागत असल्याने आलेल्या वाहनांना आत घेण्यापासून बाहेर जाण्यासाठी मदतही करावी लागते. त्यातच अनेक कर्मचारी हे आपली दुचाकी मुख्य इमारतीच्या मागील बाजूस उभी करतात. त्यामुळे त्यांना या चारचाकी वाहनांतूनही दुचाकी काढणे कठीण होते. यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात.  या प्रकारामुळे ‘जिल्हा परिषद आवार की वाहनतळ’ असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात यापुढे शासकीय वाहने, पदाधिकाºयांची वाहने तसेच अधिकाºयांच्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार असून माजी सदस्य, ठेकेदार तसेच कर्मचाºयांच्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.  तसेच दुचाकी वाहने मुख्य प्रवेशद्वारातून आणण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या आदेशामुळे गेल्या दोन दिवसांपासून खासगी वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यामुळे काही प्रमाणात आवार मोकळे जाणवू लागले आहे.मोठ्या वाहनांमुळे कोंडीत भरजिल्हा परिषद आवारात वाहन आणण्यासाठी अनेक लोक सुरक्षारक्षकाशी वाद घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच अधिकाºयांची नावे सांगून वाहने आतमध्ये आणण्यासाठी हुज्जत घातली जाते. अनेक वाहनधारक तर राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे तर वाद अधिक निर्माण होतो. विशेष म्हणजे ‘तथाकथित’ नेत्यांची वाहने ही भली मोठी असल्यामुळे तर अशी वाहने जिल्हा परिषद आवारात आल्यानंतर कोंडी अधिक वाढते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद