शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:34 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिकसभा शुक्रवारी आॅनलाइन होणार आहे. पदाधिकारी व समिती सदस्यांना आहे तेथूनच आॅनलाइन या सभेत सहभाग घेता येईल. मासिक सभा असल्याकारणाने नियमित विषयावर या सभेत चर्चा अपेक्षित असली तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यावर उपाययोजना, आगामी काळात कुपोषण निर्मूलनासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, कर्मचाऱ्यांच्या बदल्या व औषध खरेदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देऔषध खरेदीवरून विषय गाजणार असे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिकसभा शुक्रवारी आॅनलाइन होणार आहे. पदाधिकारी व समिती सदस्यांना आहे तेथूनच आॅनलाइन या सभेत सहभाग घेता येईल. मासिक सभा असल्याकारणाने नियमित विषयावर या सभेत चर्चा अपेक्षित असली तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यावर उपाययोजना, आगामी काळात कुपोषण निर्मूलनासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, कर्मचाऱ्यांच्या बदल्या व औषध खरेदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेची स्थायी, सर्वसाधारण तसेच विषय समित्यांची मासिक सभा आॅनलाइन होत असून, शासनाने कोरोनाच्या काळात संक्रमण रोखण्यासाठी शासकीय बैठका एकत्रित घेण्यात मज्जाव केला आहे. जिल्हा परिषदेची शुक्रवारी होणारी स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी प्रशासनाला पत्र पाठवून केली होती. प्रशासनानेदेखील या सभेसाठी तशी तयारी दर्शवून त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन मागविले होते. मात्र प्रशासनाने अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा घेण्यास शासन आदेशान्वये निर्बंध घातले आहेत. ़प्रशासनाने आॅनलाइनच सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्णातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आरोग्य विभाग त्यावर उपाययोजना करीत आहेत, मात्र असे असूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या विषयावर सदस्यांकडून विचारणा होण्याची शक्यता आहे. कृषी सभापती संजय बनकर यांनी प्रशासनाला पत्र देऊन आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या औषध खरेदीची माहिती मागविली असून, त्यावरून विषय गाजणार असे दिसते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMedicalवैद्यकीय