शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:37 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेतील योजना तसेच प्रधानमंत्री योजनांसाठी जिल्हा परिषदेकडून धावाधाव केली जात आहे.

ठळक मुद्देआढावा बैठका : अनुदान वितरणाला गती देण्याची तयारी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेतील योजना तसेच प्रधानमंत्री योजनांसाठी जिल्हा परिषदेकडून धावाधाव केली जात आहे. जिल्हा परिषदेकडून या संदर्भातील अनुदान देण्याबाबतची देखील तजवीज केली जात आहे.नाशिक जिल्हा परिषदेचा घरकुल आाणि शौचालय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्ह्याने या कामांचे मोठे आव्हान स्वीकारले आहे. या योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सध्या माहिती मागविली जात असून मुख्य कार्यकारी अधिकारी या कामासाठी तालुकापातळीवर संपर्क साधून आहेत.जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणात सुटलेल्या लाभार्थ्यांचे शौचालय विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी व शौचालय अनुदान मागणीसाठी जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकांचे आयोजन येत असून, निफाड व बागलाण येथील बैठकांमध्ये याबाबत सखोल आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद गटनिहाय जिल्ह्यात प्रथमच आढावा घेण्यात येत असून, पात्र लाभार्थींना अनुदान वितरित करण्यासाठी जिल्हा कक्षाकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा मार्च-२०१८ मध्ये हागणदारीमुक्त झालेला आहे; मात्र शासनाकडून जिल्ह्याला अनुदान प्राप्त नसल्याने लाभार्थींना अनुदान वाटप करता आलेले नव्हते. सदरचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून, शासनाच्या निर्देशाप्रमाणे लाभार्थींच्या खात्यावर अनुदान वर्ग करावयाचे असल्याने त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे बँक खातेनिहाय प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र ग्रामसेवकांकडून प्रस्ताव सादर करण्यास विलंब होत असल्याने जिल्हा कक्षाच्या वतीने गटनिहाय आढावा बैठका घेण्यात येत असून, यामध्ये त्या गटातील ग्रामसेवकांचा आढावा घेण्यात येत आहे.गटनिहाय ग्रामसेवकांचा आढावागटनिहाय आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकांमध्ये ग्रामसेवकांचा आढावा घेण्यात येत आहे. शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थींचे अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे, पायाभूत सर्वेक्षणात सुटलेल्या व शासनाने बांधकामासाठी मंजुरी दिलेल्या लाभार्थींकडून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून घेणे यासह विविध विषयांबाबत आढावा घेण्यात येत आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा