शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:43 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांना तसेच पंचायत समित्यांना भेटी दिली असता, अनेक कार्यालये धूळ, जळमटांनी माखले असून, तुटलेले फर्निचर, अडगळीचे सामान पडलेले आढळून आल्याने दिव्याखाली अंधारासारखी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश भुवनेश्वरी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदी : सीईओकडून स्वच्छतेचे आदेश

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांना तसेच पंचायत समित्यांना भेटी दिली असता, अनेक कार्यालये धूळ, जळमटांनी माखले असून, तुटलेले फर्निचर, अडगळीचे सामान पडलेले आढळून आल्याने दिव्याखाली अंधारासारखी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश भुवनेश्वरी यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे यंदाही हा क्रमांक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावोगावी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत केले जात असलेले काम पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना भेटी दिल्या असता, त्यात अत्यंत गलिच्छता आढळून आली आहे. अनेक ठिकाणी बंद असलेले संगणक, प्रिंटर अजूनही टेबलांवरच पडून असून, टेबल फॅन, कार्यालयातील ट्युबलाइट, कपाटे, नस्त्यांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयातील खोल्यांचे कोपरे, छताला धूळ, जळमटे लागल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पाहून भुवनेश्वरी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून महिन्याच्या दर तिसऱ्या शनिवारी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत प्रत्येक कार्यालयाने आपापल्या कार्यालयाची स्वच्छता करावी, असे आदेशही दिले आहेत. प्लॅस्टिक बंदीबाबत जागृतीकार्यालयातील स्वच्छतेप्रमाणेच सरकारने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीबाबत जाणिव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दैनिक वापरामध्ये व कार्यालयातील कामकाजात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या आहेत.विजेचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी कार्यालयातील विजेच्या उपकरणांचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा व विजेची बचत करावी अशा सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य