शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:38 IST

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात

ठळक मुद्देसरकार राजी : मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अवलंबून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असून, या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट घेतली आहे. मुदतवाढीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असून, याच दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व रणधुमाळी असणार आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविल्यास त्यातून पक्षांतर्गत राजी-नाराजी उफाळून येण्याची व त्यातून सत्तेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाºया जिल्हा परिषदांच्या पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ दिली जावी, असा मतप्रवाह राज्यातील विद्यमान पदाधिकाºयांचा आहे. त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जवळपास अडीच महिने कोणतेही भरीव कामकाज जिल्हा परिषदांमध्ये होऊ शकले नाही. जून व जुलै महिना वगळता आॅगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाºयांना त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाप्रमाणे कमी महिनेच कामकाजासाठी मिळणार आहेत. त्याचा विचार करता सहा महिने मुदतवाढ दिल्यास पदाधिकाºयांना निवडणुकीच्या तोंडावर खूष ठेवता येणे शक्य होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन उपरोक्त बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या या मताशी राज्यकर्त्यांनीही सहमती दर्शविली असून, त्यासाठी अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा व त्यानंतर विधीमंडळ अधिवेशनात कायदा मंजूर करून घ्यावा लागणार आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील उपरोक्त हालचालींना दुजोरा दिला असून, सरकारा याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तथापि, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र इंकार केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद