शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:50 IST

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांच्या व तेरा पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे दोन गट व दोन पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांच्या व तेरा पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे दोन गट व दोन पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीबरोबरच त्या त्या गट व गणांत सोमवारपासून निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली असून, १२ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.नाशिक जिल्हा परिषदेतील कळवण तालुक्यातील मानूर व दिंडोरीतील खेडगाव या दोन गटांची जागा रिक्त असून, मानूर गटातून विद्यमान खासदार डॉ. भारती पवार या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या, तर खेडगावमधून निवडून आलेले माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निफाड तालुक्यातील नांदुर्डी व नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या पंचायत समितीतील दोन गणांतील सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत. (पान ९ वर)राज्यातही अन्य जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पदे विविध कारणांस्तव रिक्त असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच या मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच, राजकीय हालचालींना वेग आला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड तोंडावर आलेली असताना त्यातच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे.१३ डिसेंबरला होणार मतमोजणीसोमवारी सायंकाळपासूनच निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी, तर ४ डिसेंबरला अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. १२ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक