शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद : निपटारा सुरू; महत्त्वाच्या विभागांच्या फाइल्सवर तत्काळ तोडगा फाइल्स ‘बोलू लागल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:23 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील फाइल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाइल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाºया मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाइल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे.

ठळक मुद्देफाइल्स निपटारा करण्याचे आदेश तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी

नाशिक : जिल्हा परिषदेतील फाइल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाइल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाºया मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाइल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार असून, त्यांनी फाइल्स निपटाºयाला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते रजेवर गेले असले तरी कामकाजाला कोणताही ब्रेक लागला नसल्याचा दावा लांडगे यांनी केला आहे. अधिकारी आणि खातेप्रमुखांकडून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या टेबलावर आणलेल्या फाइल्स या बेकायदेशीर तसेच यापूर्वीच्या अधिकाºयांनी नाकारलेल्या असून, अशा फाइल्सवर कोणत्याही प्रकारे स्वाक्षरी न करण्याची भूमिका मीणा यांनी घेतली होती. त्यांच्या काळात जवळपास सर्वच विभागांच्या फाइल्स पडून होत्या. ‘टॉक’ म्हणजे चर्चा करा असा शेरा मीणा हे मारत असले तरी प्रत्यक्षात ते कुणाशीही चर्चा करीत नसल्याने फाइल्सचा कोणताही निर्णय होत नव्हता. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीदेखील फाइल्स निपटारा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही फाइल्सचा प्रवास थांबलेला होता. ‘टॉक’ म्हणून बंदिस्त झालेल्या किंवा एका कोपºयात पडलेल्या फाइल्स आता ‘बोलू लागल्या’ आहेत. या फाइल्सवर निर्णय घेऊन तोडगा काढला जात आहे. दरम्यानच्या काळात मीणा यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवे मुख्य कार्यकरी अधिकारी म्हणून नरेश गिते यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र आपल्या खासगी कामानिमित्ताने येत्या २२ तारखेपर्यंत रजेवर गेल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अनिल लांडगे हे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहेत. त्यांनी फाइल्स निपटारा करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून, आत्तापर्यत ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, तसेच स्वच्छता विभागाच्या फाइल्सचा निपटारा करण्यात आला आहे.लांडगे यांनी संबंधित विभागात जाऊन फाइल्सवर तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावली आहेत, तर आता शिक्षण विभागाच्या फाइल्सची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. महत्त्वाच्या विभागांच्या खात्यांच्या फाइल्स पडू न देता त्यावर तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला जात आहे. फाइल्सची कामे थांबली नाही तर आता वेगाने सुरू असल्याचे लांडगे यांनी सांगितले.