शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:42 IST

शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.

ठळक मुद्देशीतल सांगळे : उपाययोजना करण्याचे दिले आदेश

नाशिक : शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.पाणीटंचाईबाबत मंगळवारी येवला येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी दराडे, तहसीलदार वारोळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी शीतल सांगळे यांनी पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करून याबाबतचे सर्व गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. गिते यांनी विंधन विहिरींचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे तसेच याकामी हलगर्जीपणा केल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ३८ गाव पाणीपुरवठा योजना, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, चाराटंचाई आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या २१ टँकर सुरू असून, त्याद्वारे ३६ गाव व २६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखीही टँकर लागणार असतील तर त्याचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.अंदरसूल येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मार्गदर्शन करताना डॉ.गिते यांनी या योजनेच्या पाइपलाइनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.बैठकीस पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, उपसभापती रूपचंद भागवत, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, पंचायत समिती सदस्य कांतीलाल साळवे, भूजल विकास यंत्रणेचे बेडवाल, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई