शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

टपली मारल्याच्या रागातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:05 IST

नाशिक : डोक्यात टपली मारल्याबद्दल जाब विचारल्याने रागातून मित्राने पोटात चाकूने वार केल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या शिवाजीनगरमधील युवकाचा रविवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ बबन सोमा बेंडकुळे (२५, रा. यशोधन रोहाउस, सिद्धिविनायक मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दि. २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एकास अटक तर दुसरा फरार आहे़

ठळक मुद्दे रागातून मित्राने पोटात चाकूने वार दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : डोक्यात टपली मारल्याबद्दल जाब विचारल्याने रागातून मित्राने पोटात चाकूने वार केल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या शिवाजीनगरमधील युवकाचा रविवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ बबन सोमा बेंडकुळे (२५, रा. यशोधन रोहाउस, सिद्धिविनायक मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दि. २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एकास अटक तर दुसरा फरार आहे़गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत बबन बेंडकुळे व संशयित आकाश सुरेश पवार (रा. शिवशक्ती चौक), तुषार दिनेश लांडे (२६) हे एकमेकांचे मित्र आहेत़ दि. २९ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेंडकुळे हा घराजवळून पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून (एमएच १५, सीएक्स ०३५५) आलेले पवार व लांडे आले़ यापैकी पवार याने बेंडकुळेच्या डोक्यात टपली मारली असता, त्यास डोक्यात पाठीमागून टपली का मारली याचा बेंडकुळे याने जाब विचारला़ याचा राग आलेल्या लांडे याने बेंडकुळेचे हात धरले तर पवारने कमरेचा चाकू काढून पोटात खुपसला़