चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात अज्ञात ३० वर्षीय तरुणाने झाडाला स्टोलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत मेसनखेडेचे पोलीसपाटील अनिल मारुती ठोंबरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात खबर दिली. हवालदार अशोक फुलमाळी यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह खाली उतरविला. आत्महत्या केलेल्या तरुणाची उंची पाच ते साडेपाच फूट असून, उजव्या हातावर ॐ अक्षर गोंदलेले असून, अंगात पांढरा काळ्या रंगाचा टी-शर्ट, मेहंदी रंगाचे जॅकेट, निळ्या रंगाची स्पोर्ट पॅण्ट घातलेली आहे. चॉकलेटी रंगाची चप्पल असे या तरुणाचे वर्णन आहे. घटनास्थळापासून १०० फुटावर एक टॉवेल अंथरलेला आढळून आला. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फुलमाळी करीत आहेत.
मेसनखेडे शिवारात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:18 IST