शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातुन युवकांनी केली इतिहासकालीन बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:28 IST

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.

ठळक मुद्देदिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले.

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.बागलाण तालुक्यापासुन १३ किमी अंतरावर असलेल्या वरदर शिवारात राणी आहिल्याबाई होळकर कालीन बऱ्याच विहीरींची कामे झाली आहेत. जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी या विहीरींची निर्मिती करण्यात आली होती.विहीरींचे बांधकाम दगडांमध्ये असून पाणी भरण्यासाठी या बारवमध्ये उतरण्याकरीता पायऱ्यांची सोय करण्यात आली होती, पण काळाच्या ओघात हया इतिहास कालीन वास्तुंकडे, विहीरींकडे शासनाबरोबरच जनतेचा ही कानाडोळा होत गेला. दुर्लक्षीत झालेल्या या विहींरीची बºयाच भागात मरणप्राय अवस्था झाली आहे.येथील वरदर शिवारातील विहीर देखील याला अपवाद नव्हती. संपूर्ण विहीर झाडाझुडपांनी व गवताने वेढली गेली होती. जवळ गेल्या नंतर सुध्दा येथे इतिहास कालीन विहीर असेल असे वाटत नव्हते. कंधाणेतील युवकांनी एकत्र येत या इतिहास कालीन विहीरीच्या पुर्नजीवन करण्याची संकल्पना मांडली, आणि सदर युवकांबरोबरच पालकांनी ही हातात कुºहाडी, कुदळ, पावडे, टोपली घेत तरूणांच्या खांदयाला खांदा लावुन दिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले आहे.शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा हया विहीरींचे काम हाती घेवुन हया ऐतिहासिक वारसाचे संगोपण करण्याचा संकल्प हया तरूणांनी केला आहे. श्रमदानात शांताराम बिरारी, हिरामन मांडवडे, समाधान बिरारी, संदीप बिरारी, जगन मांडवडे, गिरीश मांडवडे, निशांत बिरारी, नितिन सूर्यवंशी, हयांनी सहभाग घेतला.१) मित्रांनी एकत्र येत श्रमदानातुन या विहीरीची स्वच्छता केली आह.े बºयाच दिवसांपासुन पडीत असल्याने विहीर मातीने बुजली गेली आहे. शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्वच्छता करणार आहोत.संदीप बिरारी, कंधाणे.२) या भागात होळकर काळात जनतेच्या सेवेसाठी बºयाच विहींरीची निर्मिती करण्यात आल्याची नोंद आहे. पण काळाच्या ओघात दुर्लक्षीत या विहीरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक भागातील तरूणांनी श्रमदानातुन हा ठेवा जिंवत ठेवावा, असे वाटते.डॉ. अभिमन बिरारी, प्राध्यापक, इतिहास संशोधक, कंधाणे.