शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरीला स्फोटात युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:50 IST

चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सायखेडा : चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चांदोरी येथे ग्रामपालिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एक दुमजली घरात सकाळी गूढ स्फोट झाल्याने मोठा आवाज होऊन इमारतीचा मागील भाग कोसळला, तर पुढील भाग खिळखिळा झाला आहे. या अपघातात घरातील सचिन हा युवक किरकोळ जखमी झाला. पोलीसपाटील अनिल गडाख यांनी फोनद्वारे सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले असून, त्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण कळू शकेल, असे सांगण्यात आले.चांदोरी ग्रामपालिका कार्यालयाजवळ मारूती मंदिरासमोरील माणिकराव गायखे यांच्या दुमजली घरात गेल्या पंधरा वर्षांपासून वाल्मीक अण्णा सोनवणे हे भाडेतत्त्वावर राहत आहे. शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचे मोठे नुकसान झाले . सकाळी सचिनने गॅसवर अंघोळीसाठी पाणी ठेवले होते. थोड्या वेळाने गॅसची नळी लीक झाल्याचे निदर्शनास आहे.या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.काळे, मनोज मुंडे अधिक तपास करीत आहेत.