शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बदलून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:01 IST

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्दे‘घेतला ना भो अखेरचा निरोप’

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १९) सकाळी७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे या युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी आढळून आले. पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीप एसवायबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने दोन वर्षापूर्वी फायर सेफ्टीचा कोर्स केला होता. सध्या तो एक वर्षापासून मुसळगावच्या सहकारी औद्योगिक वसाहतीतील रिंग गिअर्स या कारखान्यात काम करीत होता.शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ड्यूटी संपवून संदीप घरी आला. सायंकाळी त्याने गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला घेतला. रात्री९ वाजता जेवण करून झोपी गेला. शनिवारच्या मध्यरात्री केव्हातरीउठून त्याने आत्महत्या केल्याचे समजते.घरापासून सुमारे हजार फूट अंतरावर असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाच्या वीस फूट उंचीच्या फांदीला तार व दोरी बांधून गळ्यात अडकून फांदीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास भाऊ गणेश सैंद्रे याने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. पोलीसपाटील रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची खबर दिली.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सिन्नर नगर परिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी पंचाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राम भवर अधिक तपास करीत आहेत.स्टेट्स पाहून नातेवाइक, मित्रांना धक्कासंदीप याने रात्री आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेट्स बदलले. ‘घेतला ना भो अखेरचा निरोप’ असे स्टेट्स टाकून त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी मित्र व ग्रामस्थांनी संदीपच्या आत्महत्येची बातमी समजली तेव्हा त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला. सकाळी कुटुंबातील सदस्यांना घरात संदीप दिसत नसल्याने शोधाशोध सुरू केली. तेव्हा आत्महत्याचा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :NashikनाशिकSuicideआत्महत्या