शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

पवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचा खून

By admin | Updated: April 29, 2015 23:41 IST

४५०० रुपयांची लूट

नांदगाव : पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चोरट्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात बिहार येथील परप्रांतीय तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. बचावासाठी सरसावलेल्या मृताच्या भावाला दोघा हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवत खिशातील रोकड काढून नांदगाव रेल्वे फाटकाजवळ पलायन केले.नाशिक येथील राणेनगर परिसरात हॉटेलवर काम करणारे सुनीलकुमार साफी (२०) व महेशकुमार साफी रा. हमाडर, पोस्ट जितबापुर थाना रहिका, जि. मधुबनी, बिहार हे नाशिकरोड रेल्वे स्थानकातून बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पवन एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यातून बिहार येथे जाण्यासाठी निघाले. मनमाड येथून डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी सुनीलकुमार यास धक्काबुकी करत चाकू काढून त्याच्या छातीच्या उजव्या भागावर वार केले. हल्लेखोरांनी सुनीलकुमार याचा भाऊ महेशकुमार यास त्याच्या भावाच्या पॅण्टच्या खिशातील पैसे काढण्यास धमकावले. भीतीने भेदरलेल्या भावाने ४५०० रु पये काढून हल्लेखोरांच्या हवाली केले. त्यानंतर हल्लेखोरांनी नांदगाव फाटकाजवळ चेन पुलिंग करून रक्ताने माखलेला शर्ट बदलून पलायन केले. जखमी सुनीलकुमार याला अन्य प्रवशांनी रेल्वे फाटकावर उतरवले. रिक्षाचालकाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉ. रोहन बोरसे यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना मनमाड व नांदगाव स्थानकादरम्यान घडल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)भरदिवसा तरु णाचा खून होतो यावरून रेल्वे सुरक्षेची दैना उडाली असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली आहे.