घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात जिंदाल कारखान्याजवळ दुचाकीला कारने धडक दिल्याने मालुंजे येथील युवक जागीच ठार झाला. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.मालुंजे येथील देवकिसन बंडू गायकवाड (३५) व नवनाथ बंडू वाघ (२३) दुचाकीने (क्र. एमएच १५ सीई २१८) सकाळी गोंदे औद्योगिक वसाहतीत कामासाठी जात असताना जिंदाल कारखान्याजवळ मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच ०५ एएक्स ७४८६) जोरात धडक दिल्याने देवकिसन गायकवाड हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती घोटी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे, चालक नितीन भालेराव आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नरेंद्रनाथ स्वामी रुग्णवाहिकेतून उपचारार्थ नाशिकला दाखल केले. मात्र दरम्यान देवकिसन गायकवाड यांचा मृत्यू झाला. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.(वार्ताहर)
मालुंजे येथील युवक अपघातात ठार
By admin | Updated: March 7, 2017 00:49 IST