लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : अज्ञात वाहनाने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील विनायक नवनाथ वरंदळ (२७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. विनायक वरंदळ हा युवक बुलेट मोटारसायकल (क्र. एम. एच. १५ ई. झेड. ९२४८) ने रात्री सिन्नरकडून लोणारवाडीकडे जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विनायक याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनाच्या धडकेत युवक ठार
By admin | Updated: June 1, 2017 00:51 IST