शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अल्पवयीन मुली असुरक्षित

By admin | Updated: June 9, 2014 01:00 IST

विकृतीत वाढ : नात्याला फासला जातोय काळिमा; बालिकाही ठरताहेत शिकार

 

नाशिक : शहरात गेल्या पाच महिन्यांत तब्बल १६ बलात्कार, तर ३७ विनयभंगाच्या घटना घडल्या असून, विशेष म्हणजे, नात्यालाच काळिमा फासण्याचे प्रकार यातून समोर आले आहेत. जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याच्या दोन घटनांही पुढे आल्या आहेत. परिणामी, शहरातील अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचे चित्र आहे. या वर्षी गेल्या जानेवारी महिन्यात एक बलात्कार व सहा विनयभंगाच्या घटना घडल्या. फेबु्रवारीमध्ये एका बलात्कारासह सात विनयभंग, मार्चमध्ये पाच बलात्कार, दहा विनयभंग, एप्रिल महिन्यामध्ये तीन बलात्कार व ११ विनयभंग, तर मे महिन्यात सर्वाधिक पाच बलात्कार व १३ विनयभंगाचे गुन्हे घडले. सध्या सुरू असलेल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एक बलात्कार व तीन विनयभंगाच्या घटना घडून गेल्या आहेत. या सर्व घटनांमधील अधिकाधिक पीडित व्यक्ती या अल्पवयीन मुली आहेत़ एवढेच नव्हे, तर पीडितांमध्ये दोन बालिकांचाही समावेश आहे़ विनयभंगाच्या एकूण घटनांपैकी सहा महिला वगळल्यास उर्वरित सर्व अल्पवयीन मुलीच पीडित आहेत. दरम्यान, पित्यानेच आपल्या १५ वर्षांआतील मुलीवर अत्याचार केल्याच्या शहरात घडलेल्या दोन घटना अवघ्या शहरवासीयांना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. याशिवाय सख्ख्या भावाने तीन मित्रांच्या सहाय्याने बहिणीवर बलात्कार केल्याची गंगापूर परिसरातील घटनाही घृणास्पद आहे. कामटवाडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ६२ वर्षीय वृद्ध नऊ महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करीत असल्याची घटनाही उघडकीस आली. पेठ रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगत असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या तेरावर्षीय बालिकेवर एका उत्तर भारतीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. उपनगर येथील जयभवानी रोडवरील पाटोळे मळ्यात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला नात्यातीलच तीन युवकांनी पळवून नेल्याची घटना घडली. तरुणीचा विनयभंग करून तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार गंगापूर नाक्यावर घडला. सिडकोच्या आझादनगर भागात चारवर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका २२ वर्षीय नराधमाने केला होता़ या सर्व घटनांत अल्पवयीन मुलीच पीडित ठरल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदि भागांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात निषेध व्यक्त करणाऱ्या महिला संघटना तथा तरुणाईने आपल्या स्वत:च्या शहरात घडणाऱ्या या घटनांबाबत मात्र साधलेली चुप्पी त्यांच्या सामाजिक जाणिवांवरच प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. (प्रतिनिधी)