शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड घाटात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST

चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग सिन्नर: तालुक्यातील चास येथे आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात वावी पोलीस ...

चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सिन्नर: तालुक्यातील चास येथे आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश तुकाराम भाबड रा. चास असे संशियाताचे नाव आहे. सदर अल्पवयीन मुलगी आई-वडील व भाऊ यांच्यासह चास शिवारातील वस्तीवर राहते. दुपारी दोनच्या सुमारास संशयित युवक आला व त्याने विनयभंग केला, अशी तक्रार वावी पोलिसांत दिली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी-कीर्तांगळी शिवारात कडवा कॅनॉलच्या चारी नंबर ३२ लगत राधाकृष्ण शिरोळे या शेतकऱ्याची कालवड रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्याने ठार केली. आरडाओरडा केल्याने बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली; परंतु तोपर्यंत कालवड मृत्युमुखी पडली होती. वडांगळी-तारु खेडले रोड परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून तीन बिबटे अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असून परिसर भयभीत झाला आहे. वनविभागाने ताबडतोब या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

सिन्नर : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील चेहडी येथील बंधाऱ्यातील पाण्यात टी.डी.एस. व शेवाळ व इतर जैविक घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहर व उपनगरवासियांनी पुढील ५-६ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे. शहरात सध्या नळांद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची चव बदलली असल्याची व वेगळा दर्प येत असल्याच्या तक्रारी नगर परिषदेकडे येत आहेत.

भरतपूरला ‘प्रहार’चे उघडले खाते

सिन्नर : तालुक्यातील भरतपूर-लक्ष्मणपूर ग्रुप ग्रामपंचायतीत पंकज पेटारे यांचा विजय झाला असून यानिमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाने खाते उघडले आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहारचे अनेक उमेदवार कपबशी चिन्ह घेऊन मैदानात उतरले होते. त्यात भरतपूरमध्ये प्रहारचे दिव्यांग उमेदवार पेटारे विजयी झाले. तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या हस्ते पेटारे यांचा सत्कार केला.