शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनी आपली ताकद ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:47 IST

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : न्याय्यहक्कांसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी सरपंचांना त्यांच्या हक्कांचीजाणीव करून देताना सांगितले, लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सरपंच करीत असतो. सरपंच होणे सोपे; परंतु गाव चालविणे अवघड असते. सरपंचाला गावाचा गाडा हाकताना गावकऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागतो.सरपंचांची उपेक्षाचगावकीचे-भावकीचे राजकारण सांभाळून सरपंचाला गावाची प्रगती करायची असते; परंतु ग्रामविकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सरपंचांचा अपेक्षित असा सन्मान झालेला नाही. त्याच्या प्रश्नांबाबत लोकसभा-विधानसभेत कधी आवाज उठविला जात नाही. सरपंचांच्या न्याय्यहक्कांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यांनाही प्रतिनिधित्व असले पाहिजे. बळ देणारा उपक्रमआपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर गावाचा विकास शक्य आहे. गावांमध्ये स्रीभू्रणहत्या, बालविवाह यांसारख्या कुप्रथांनाही पायबंद घालण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पुरस्कार मिळतात; परंतु एखाद्या क्षेत्रात चांगले काम केले असेल आणि अन्य बाबींबाबत उणिवा असतील तर त्यासाठी लोकमतने कॅटेगरी करून सुरू केलेला हा पुरस्काराचा उपक्रम बळ देणारा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.सर्व नवीन निकषांचे प्रयोग सरपंचांवरच का केले जातात?लोकशाहीच्या प्रयोगशाळेतील पांढरा उंदीर म्हणजे सरपंच होय. सारे प्रयोग अगोदर त्याच्यावरच केले जातात. सारे नियम-कायदे त्याच्यासाठीच बनविले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिंलांसाठी आरक्षण द्यायचे; परंतु, किती महिला विधानसभा, लोकसभेवर आहेत. तीन अपत्याचा प्रयोगही सरपंचांवरच केला गेला. आमदार-खासदारांना मग कितीही अपत्ये असू द्या, त्यांना सारी मुभा. शिक्षणाबाबतही तीच गत. सरपंच दहावी पासच असावा. विरोध शिक्षणाला नाही; पण शिक्षणाची अट सरपंचांनाच का? नियम सर्वांना सारखेच असावेत, असेही पाटील म्हणाले.