शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:34 IST

चहा व्यवसायात गेल्या १३ वर्षांपासून आहे पण अशी वेळ कधी आली नव्हती. कोरोनाच्या आजाराने आम्हाला जीवनातून उठवलं. हातात होते तेवढे पैसेही खर्च झाले अन् आता चहा दुकानाच्या गाळ्याचे आणि राहत्या घराचे भाडेही थकले आहे. सांगा, आम्ही आता कसं जगायचं, असा प्रश्न येथील संदीप काशीनाथ जाधव या चहा विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : लॉकडाउनमुळे चहा विक्रेत्याची कैफियत

मालेगाव : चहा व्यवसायात गेल्या १३ वर्षांपासून आहे पण अशी वेळ कधी आली नव्हती. कोरोनाच्या आजाराने आम्हाला जीवनातून उठवलं. हातात होते तेवढे पैसेही खर्च झाले अन् आता चहा दुकानाच्या गाळ्याचे आणि राहत्या घराचे भाडेही थकले आहे. सांगा, आम्ही आता कसं जगायचं, असा प्रश्न येथील संदीप काशीनाथ जाधव या चहा विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे.मोसमपूल चौकात गेल्या १३ वर्षांपासून संदीप जाधव चहा विक्रीचा व्यवसाय करतात. दोन भाऊ आणि एक कामगार असे तिघे हा व्यवसाय सांभाळतात. कामगाराला १८० रुपये रोज द्यावा लागतो परंतु कोरोनाच्या भीतीमुळे आणि शासनाने लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवसाय बंद पडले असून आम्ही रस्त्यावर आलो आल्याची भावना जाधव व्यक्त करतात. संदीपच्या घरी आई, वडील, तीन भाऊ, वहिनी व २ मुले असा आठ जणांचा परिवार आहे. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या प्रश्नाने त्यांना सध्या चक्रावून सोडले आहे. घरात कमावते दुसरे कुणी नाही. सर्व काही हॉटेल व्यवसायावरच अवलंबून असल्याने आणि रोजचे उत्पन्न बंद झाल्याने उपासमार होऊ लागली आहे. गेल्या १५ दिवसांपासून चहा दुकान बंद आहे. दुकानाला ५ हजार रुपये भाडे आहे. घराचेही भाडे भरावे लागते. महिना भरल्याने घर आणि गाळा मालक यांचा भाडे वसुलीसाठी तगादा सुरू आहे. आम्हाला खायलाच पैसे नाही तर भाडे कसे देणार, असा सवाल ते उद्विगणेतून करतात.रोज डेअरीतून ४० रुपये लिटर दराने ९० लिटर दूध घ्यायचो, परंतु तेसुद्धा थांबले आहे. डेअरीवाल्याकडूनही हॉटेल सुरू करण्याविषयी विचारणा होते, परंतु आता व्यवसाय सुरू झाला तरी कोरोनाची भीती आहेच. कोण ग्राहक कोरोनाग्रस्त आणि कोण नाही, हे ओळखायचे कसे? कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी प्रार्थनाही संदीप जाधव करतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय