लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : येथील जॉगिंंग ट्रॅकसमोरील बोगद्याच्या ठिकाणी अद्यापर्यंत सिग्नल यंत्रणा न बसविल्याने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार (दि. १८) रोजी ‘भीक मांगो’ निदर्शने केली. गोविंदनगरकडून इंदिरानगर जॉगिंग ट्रँककडे येणाऱ्या रस्ता आधीच चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली, तरीही वाहतूक कोंडी होऊन तेथील पोलिसांना भर उन्हात उभे राहून वाहनधारकांशी अनेक वेळा तोंड द्यावे लागत आहे. पोलीस यंत्रणेचा भार कमी व्हावा आणि सिग्नल यंत्रणा सुमारे एक वर्षापासून मंजूर आहे. परंतु सिग्नल यंत्रणा बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने सिग्नल यंत्रणा खरेदी करण्यासाठी गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जितेंद्र भावे, जगबीरसिंग, पद्माकर अहिरे, विकास पाटील, एकनाथ साबळे यांनी भीक मागून निदर्शन केले.
आप कार्यकर्त्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By admin | Updated: May 19, 2017 01:09 IST