नाशिक : मातोश्री राधाबाई वावरे विद्यालयात योगसाधना शिबिर संपन्न झाले. योगशिक्षक भारती जाधव यांनी विद्यार्थ्यांना योग आणि आहाराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी योगाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. आनंदवल्ली येथे आयोजित या शिबिरात मनशांती तसेच निरोगी जीवन याविषयी सचित्र मार्गदर्शन करण्यात आले. तसेच परीक्षेचा ताण कसा कमी करावा याविषयीदेखील महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी. डी. गोेरे होते. प्रास्ताविक एस. ए. शेख यांनी केले. सूत्रसंचालन पठाण यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी के. पी. सोनार, डी. एन. मंडलिक, ए. एस. बधाणे, जी. डी. शेख, एम. एस. जाधव, व्ही. एन. रुमगे, एम. एच. पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वावरे विद्यालयात योगसाधना शिबिर
By admin | Updated: July 18, 2014 00:37 IST