शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

येवला पालिकेला दोन कोटींचा विकासनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:14 IST

येवला नगरपालिकेला विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

येवला : नगरपालिकेला विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय पालिकेने काही प्रस्ताव पाठविले असल्याचे उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांनी सांगितले.येथील पालिकेवर भाजपा-शिवसेनेची सत्ता असून, शासन स्तरावरून निधी मिळविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासन पालिकांना विशेष अनुदान देते. त्यात येवला पालिकेचा समावेश करून निधी द्यावा, अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्र देऊन केली होती. या अनुदानासह इतर निधीसाठी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मागणी केली होती. शासनाने मागील आठवड्यात राज्यातील पालिकांना दोनशे बावीस कोटी रु पये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. या अंतर्गत येवला पालिकेला विविध विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी देण्याचे शासन परिपत्रक आज दराडे यांना नगरविकास विभागाकडून मिळाले आहे. या निधीतून शहर हद्दीत विविध सार्वजनिक स्वरूपाची कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालिका करू शकते. सद्यस्थितीत शहरातील बाजारओटे, त्यासाठी शेड, काँक्रि टीकरण व ड्रेनेजची व्यवस्था करण्याचे या निधीतून प्रस्तावित असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले; मात्र यावर सर्वानुमते निर्णय घेऊन निधी खर्च केला जाणार आहे. या व्यतिरिक्त इतर विकासकामांचे प्रस्तावदेखील शासन दरबारी देण्यात आलेले आहे. भूमिगत गटार योजना नव्या स्वरूपात करण्यासाठीदेखील प्रस्ताव सादर केलेले आहेत. या कामांना निधीसाठी पालकमंत्री महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार दराडे बंधूंनी दिली.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसा