शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवला, निफाडच्या दुष्काळी परिस्थितीची होणार फेरपाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:25 IST

नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह इतर तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असूनही या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील ग्राउंड रिअ‍ॅलिटीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देभुजबळांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : सरकार पथक पाठवणार तालुक्याचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश नाही हे अत्यंत संतापजनक

नाशिक : येवला आणि निफाड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पथक पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह इतर तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असूनही या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील ग्राउंड रिअ‍ॅलिटीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. या संदर्भात भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक व सिन्नर या आठ तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निदेश देण्यात आलेले आहेत. सदर पीक कापणी प्रयोगामध्ये दारसंघातील येवला व निफाड तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. येवला तालुक्यात प्रचंड दुष्काळ असतांनाही पावसाच्या आकडेवारीसाठी तालुक्याची सरासरी काढल्यामुळे येवला तालुक्याचा दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. येवला तालुक्यातील सहा पैकी चार मंडळे प्रचंड दुष्काळाच्या छायेत आहेत. तालुक्याची सरासरी न धरता मंडळनिहाय पाऊस व इतर इंडिकेटर्सचा विचार करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेने पाठवलेल्या अहवालांचासुद्धा पीक कापणी प्रयोगासाठी विचार झाला नाही.नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेकडून मिळालेल्या पीक पाण्याच्या स्थितीनुसार दुष्काळ सदृश्य तालुके जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूरमधील राधानगरी व गगनबावडा इ. तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होवूनही या तालुक्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश होतो. आणि येवला तालुक्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे ऐन पावसाळ्यात ४८ गावांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असूनही या तालुक्याचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश नाही हे अत्यंत संतापजनक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते.येवला व निफाड तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. त्यामुळे येथील सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने पथक पाठवून या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी भुजबळ यांची मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये पथक पाठवून फेरपाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक