शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
3
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
4
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
5
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
6
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
7
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
8
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
9
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
10
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
11
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
12
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
13
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
14
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
15
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
16
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
17
Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
18
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
19
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
20
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया, दीक्षाभूमी कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 22:17 IST

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येवल्याच्या मुक्तीभूमीवर दाखल व्हायचे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने पाच दिवस ऑनलाईन मुक्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेच्या ८६व्या वर्धापनदिनी ऑनलाईन कार्यक्रम

योगेंद्र वाघयेवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येवल्याच्या मुक्तीभूमीवर दाखल व्हायचे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने पाच दिवस ऑनलाईन मुक्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे.येवल्याच्या ऐतिहासिक भूमीस जगभरात ह्यमुक्तिभूमीह्ण म्हणून ओळखले जाते. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे म्हटले जाते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील मुक्तिभूमीवर आंबेडकर अनुयायी, आंबेडकरप्रेमी व बौद्ध बांधव १३ ऑक्टोबर रोजी दरवर्षी ह्यजयभीमह्णचा जयघोष करत लाखोंच्या संख्येने येत असतात. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या या मुक्तिभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भव्यदिव्य स्मारक उभे राहिले आहे. शासनाच्या ४.३३ हेक्टर जागेत सदर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक साकारले आहे.स्मारकात ५९२.४४ चौरस मीटरचे विश्वभूषण स्तूप, ६९२.४४ चौरस मीटरचा विपश्यना हॉल, इलेक्ट्रिक रूम, तोरण गेट, संरक्षण भिंत आदी कामे करण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळच १२ फूट चौथ-यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला असून दालनात १८ फूट उंचीची तथागत गौतम बुद्धांची मूर्तीही बसविण्यात आली आहे. याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दालनात धर्मांतरण घोषणा व मंदिर प्रवेशाबाबतची भित्तिशिल्प, डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील भित्तिशिल्पेही साकारण्यात आली आहे. स्मारक परिसरात सुंदर बगीचाही करण्यात आला आहे.शासनाने मुक्तिभूमी परिसर विकासासाठी आतापर्यंत २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. भविष्यात शंभर अनुयायांसाठी पाठशाळा, अ‍ॅम्फिथिएटर, भिक्खू निवास, विपश्यना हॉल, कर्मचारी निवासस्थान आदी कामे प्रस्तावित आहेत. येवला मुक्तिभूमी ही दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी पवित्रस्थळ म्हणून विकसित झाले आहे. सध्या या परिसराच्या देखभालीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. बार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबविले जात असतात.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेचा ८६ वा वर्धापन दिनानिमित्त दि. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान रोज सायंकाळी ६ ते ७:३० वा.ऑनलाईन ह्यमुक्ती महोत्सव २०२१ - मुक्तीभूमी येवलाह्ण हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात देश विदेशातील सुप्रसिद्ध विचारवंत,साहित्यिक, कलावंत,सनदी अधिकारी सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन दि. १३ रोजी सायंकाळी ६ वा. सुप्रसिद्ध वैद्य डॉ.संग्राम पाटील (लंडन) यांच्या हस्ते होणार आहे.

दि. १४ रोजी सायंकाळी ६ वा.परिसंवाद ह्यमहाकवी वामनदादा कर्डक यांचे शाहिरी,साहित्यातील संविधानिक मूल्यविचारह्ण या विषयावर परिसंवाद होणार असून यात प्रा. डॉ.उत्तम अंभोरे, डॉ. किशोर वाघ, कवी विनायक पाठारे सहभागी होणार आहेत. दि. १५ रोजी डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची प्रसारमाध्यमे या विषयावर परिसंवाद होणार असून यात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा.अर्जुन कोकाटे सहभागी होतील. तर दि. १६ रोजी सायंकाळी ४ वा. होणाऱ्या व्याख्यानात इ. झेड. खोब्रागडे, मनीषा पोटे सहभागी होणार असून दि. १७ रोजी समारोप होणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर