शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:56 IST

निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने माघ पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिफाड : खंडेराव महाराज यात्रेत कावडीची मिरवणूक

निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने माघ पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.सकाळी देवीदास अहेर, अण्णा शेलार, रोहित दुसाने यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर कादवाकाठी खंडोबा महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात येऊन कावडीतून आणलेल्या गंगाजलाची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण्यात आला. मिरवणुकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने नृत्य करून लक्ष वेधून घेतले. यानंतर गंगाजलाने खंडेराव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.दुपारी देवाचे मानकरी कचेश्वर दुसाने यांच्या निवासस्थानापासून देव मंदिरात आल्यानंतर रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचे रथाचे मानकरी ब्रिजलाल भुतडा होते. सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने व खंडेराव महाराज की जयच्या जय जयकाराने शिवाजी चौकात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. पिवळ्या रंगाने रंगविण्यात आलेल्या गाड्या मंदिराचे भगत रमेश शेलार यांनी ओढल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ याच्यासह नगरसेवक व मुख्य अधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यात्रोत्सवानिमित्त रविवारी (दि. ४) सकाळी ९वा. नाशिक सायकलिस्ट व पावा ग्रुप यांच्या वतीने नाशिक ते निफाड सायकल रॅली काढण्यात येणार आहे.वेदिका वेल्फेअर फाउण्डेशन नाशिक, पावा ग्रुप नाशिक व निफाड डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोरायसिस आरोग्य तपासणी व ग्रामसंस्कार केंद्रात सकाळी १० वा. महिलांसाठी रांगोळी व पाककला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ, मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भगवान गाजरे, उपाध्यक्ष संजय कुंदे, खजिनदार जानकिराम धारराव, सुभाष कर्डिले, नामदेव जाधव, साहेबराव कापसे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.चांदवड येथे यात्रोत्सवचांदवड : येळकोट, येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराजकी जयच्या जयघोषात चांदवड येथील राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सव संपन्न झाला. घटस्थापना मार्तंड देवस्थान ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. आठवडे बाजारातील हनुमान मंदिरापासून निघालेल्या कावडी रथाचे मानकरी दत्ताभाऊ बाजीराव कोतवाल होते, तर कावडी व गंगाजल सिद्धेश्वर मित्रमंडळ, कोतवाल वस्ती यांनी केली.सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संजय बाबूराव गवळी यांच्या हस्ते झाला. तर मिश्रीलाल तनसुखलाल अग्रवाल यांच्या वतीने महाप्रसाद झाला. रात्री पुजारी निवृत्ती अण्णा जेऊघाले, पप्पूभाऊ आहेरराव, रायपूर व सर्व रायपूर बेट यांचा लंगरी जागरणाचा कार्यक्रम झाला. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी अनिल कोतवाल, उपाध्यक्ष आदित्य फलके, आदेश शेळके, विशाल गवळी, गणेश गवळी, अरुण शिंदे, श्यामभाऊ सोनवणे, सुनील कोतवाल व खंडेराव महाराज यात्रा पंचकमिटीने केले.