शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

येवा कोकण : देशाटनासाठी नाशिककर दिवाळीत गाठणार समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:22 IST

पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण अदि भागांचा समावेश आहे. पर्यटनविकास महामंडळाकडेही आगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे.

ठळक मुद्देआगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे.सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात येवा कोकण आपलोच आसा...

नाशिक : यंदाच्या दिवाळी सुटीच्या हंगामात सालाबादप्रमाणे नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून के रळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.दिवाळीच्या पार्र्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असते. तीन ते चार दिवसांचा सण आटोपताच सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात आहेत. पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण अदि भागांचा समावेश आहे. पर्यटनविकास महामंडळाकडेही आगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे.

यावर्षी केरळकडे जाण्याचा पर्यटकांचा ओघ अत्यंत कमी आहे. त्याऐवजी नागरिकांकडून कोकण परिसरातील समुद्रकिनाºयासह गोव्याची निवड केली जात आहे. कोकण टूरसाठी पर्यटकांची संख्या अधिक आहे. भारतातील पश्चिम समुद्रकिनारा आणि सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेल्या कोकणामधील निसर्गसौंदर्याचा अनुभव पर्यटकांकडून मोठ्या संक्येने लुटला जाणार आहे. पर्यटन विकास महामंडळासह खासगी पर्यटन व्यावसायिकांकडेही पर्यटकांनी ‘कोकण पॅकेज’ची नोंदणी केली आहे. तसेच राजस्थान राज्याच्या पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. राजस्थानमधील गड-किल्ले, वाळवंट बघण्यासाठी जयपूर, जोधपूर, जैसलमेरसारख्या शहरांची पर्यटकांकडून निवड केली जात आहे.

येवा कोकण आपलोच आसा...यंदा दिवाळीच्या हंगामात लकोकणातील तारकर्ली, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर, हरिहरेश्वर, वेलनेश्वर, दिवे-आगर, आवास, मालवण, रेवदंडा, अलिबाग असे सुमारे बारा ते पंधरा समुद्रकिनारे कोकणाला लाभलेले आहे. तसेच भेरलीमाड, राया, आंबा, सुपारी, केळी, फणस, नारळ,काजू, कोकमसह भातशेती हे कोकणाचे वैशिष्टय मानले जाते. कोकण पर्यटनामध्ये बहुतांश पौराणिक मंदिरांना भेटी देत धार्मिक पर्यटनासह सागरी व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. याबरोबरच विजयदुर्ग, मुरूड-जंजिरा, महाडजवळील रायगड या किल्ल्यांची भटकंती करत दुर्ग पर्यटनही पूर्ण करता येते.

टॅग्स :konkanकोकणNashikनाशिकtourismपर्यटनDiwaliदिवाळी