शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या दुचाकीचोराला म्हसरूळमध्ये अटक; आठ मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 21:34 IST

नाशिक : येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणार्‍या अट्टल दुचाकीचोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरूवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने त्याला ताब्यात घेतले.येवला शहरात मुख्य बाजारपेठसह गर्दीच्या ठिकाणांवरून मोठ्या संख्येने दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरट्यांनी येवल्यात घातलेला धुमाकूळाने नागरिक त्रस्त झाले असताना अखेर एक दुचाकी ...

ठळक मुद्दे. पथकासह म्हसरुळ गाव पिंजून काढत पोलिसांनी ऋ षिकेश यास अटक केली.

नाशिक : येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणार्‍या अट्टल दुचाकीचोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरूवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने त्याला ताब्यात घेतले.येवला शहरात मुख्य बाजारपेठसह गर्दीच्या ठिकाणांवरून मोठ्या संख्येने दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरट्यांनी येवल्यात घातलेला धुमाकूळाने नागरिक त्रस्त झाले असताना अखेर एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या गळाला लागला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांनी तपासाची सुत्रे फिरवून कमी किंमतीत बनावट वाहनक्रमांक तयार करुन विक्री करणार्‍या चोरट्यांचे ‘नाशिक-येवला’ क नेक्शन तपासण्यास सुरूवात केली. दरम्यान, ऋषिकेश अरुण आहेर (२८) हा तरुण दुचाकी चोरून कमी किंमतीत विक्री करत असल्याचे खात्रीलायक वृत्त करपे यांना मिळाले. यानुसार त्यांनी म्हसरूळ परिसरात सापळा लावला. पथकासह म्हसरुळ गाव पिंजून काढत पोलिसांनी ऋ षिकेश यास अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता कुठल्याही प्रकारचे हत्त्यार वगैरे मिळून आले नाही; मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराचे नाव, पत्ता आदि माहिती सांगत येवल्यामधून चोरलेल्या आठ दुचाकी कोठे दडवून ठेवल्या, ती जागा दाखविली. पोलिसांनी सदर जागेवरून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, येवल्याच्या दुचाकीचोराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने तेथील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये दोन स्पेलेंडर-प्लस, एक स्पेलेंडर-प्रो, अपाचे, टीव्हीएस स्टार सिटी, शाईन, बुलेट या प्रकारच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत असून या दुचाकीचोरट्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक