यंदा २५ टक्केच द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:21 PM2020-04-09T22:21:54+5:302020-04-09T23:14:51+5:30

जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

This year only 5 percent of grapes exported | यंदा २५ टक्केच द्राक्ष निर्यात

यंदा २५ टक्केच द्राक्ष निर्यात

Next
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : तीन लाख मेट्रिक टन माल पडून, उत्पादक धास्तावले

शेखर देसाई।
लासलगाव : जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.
मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
कधी अवकाळी तर तर अस्मानी संकटाचा सामना करणारे द्राक्ष बागायतदारांना यावर्षी चांगले दर मिळण्याची शक्यता आता कोरोनामुळे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे देशाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. नाशिक जिल्हा द्राक्षाचे आगारच आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
नाशिक जिल्हा व परिसरामध्ये अजूनही ६० हजार एकरच्या जवळपास द्राक्षबागा तयार असून साधारणत: साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्ष अजूनही पडून आहे. कोरोनामुळे मजुरांअभावी द्राक्ष निर्यात पूर्णत: कोलमडली असून निर्यातक्षम द्राक्ष २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, मात्र इतके कमी दर असूनही द्राक्षाला ग्राहक नसल्याने शेतकºयांना या द्राक्षाचे बेदाणे करावे लागत आहे.

संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीण
नाशिक जिल्ह्यातून १८ देशांमध्ये आतापर्यंत द्राक्षाची निर्यात करण्यात आलेली आहे. द्राक्ष पंढरी असलेल्या जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपत आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यातून ८३ हजार ५०० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षे सातासमुद्रापार असणाºया अनेक देशात निर्यात होतात. परिसरातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवर मात करून गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात. यावर्षी तर अवकाळीमुळे निर्माण झालेले खराब वातावरण अशी प्रचंड मेहनत घेत शेतकºयांनी निर्यातक्षम द्राक्षबागा वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यातच कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने त्याचा द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसतो आहे. मागील ४ एप्रिलपर्यंत वर्षी जिल्ह्यातून १ लाख ९ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती, मात्र या कोरोना संकटामुळे यंदा द्राक्ष निर्यात रोडावली असून, मोठ्या प्रमाणात द्राक्ष हे बागेतच पडून आहेत.

देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. बागायतदारांकडे असलेले मजूर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजिंगसाठीदेखील कामगार लागतात, मात्र संचारबंदीमुळे पाचपेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याचीदेखील अडचण निर्माण झाल्यानेच याचा फटका द्राक्षबागेला बसला आहे.
- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

वर्षनिहाय द्राक्ष निर्यात व मिळालेले परकीय चलन
२०१५-१६ - १३२६४७ मेट्रिक टन - १३६२.२७ कोटी
२०१६-१७ - १९८४७१ मेट्रिक टन - १७८१.७१ कोटी
२०१७-१८ - १८८२२१ मेट्रिक टन - १९०० कोटी
२०१८-१९ - २४६१३३ मेट्रिक टन - २३३५ कोटी

Web Title: This year only 5 percent of grapes exported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.