शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कांदा लागवड महिनाभर उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:42 IST

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी उन्हाळ कांद्याच्या लागवड यंदा मात्र दीड महिना लांबणीवर पडली. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे. सध्या उपलब्ध रोपात कांदा लागवड करण्याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून, शेतकरी कांदा लागवडत व्यस्त आहे.

ठळक मुद्देकुकाणे : रोपअभावी लागवडीत ४० ते ५० टक्के घट; मजुरांअभावी हाल

महेंद्र पगार ।कुकाणे : दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी उन्हाळ कांद्याच्या लागवड यंदा मात्र दीड महिना लांबणीवर पडली. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा रोपे खूप मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे उशिराने लागवड सुरू झाली आहे. सध्या उपलब्ध रोपात कांदा लागवड करण्याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून, शेतकरी कांदा लागवडत व्यस्त आहे.मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून काही प्रमाणात आदिवासी मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत आहेत. तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मजुरीचे दरही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रुपये रोज असा दर आहे. बियाणे, खते आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे. यंदा कांद्याला विक्रमी बाजारभाव असल्यामुळे इतर पिकांपेक्षा चार महिन्यांच्या कांदा पिकाची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे, परंतु शेतकºयांना अधूनमधून पडणाºया ढगाळ हवामानामुळे औषधफवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकºयांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या एक एकर लागवडीसाठी १३ ते १५ हजार रुपये मजूरवर्ग घेतात. एक एकरासाठी साधारणत: ८० हजाराच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होतो. एवढाखर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.१५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार लागवडयंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ६० टक्के कांदा रोपे खराब झाल्यामुळे शेतकºयांनी एक-दोन नाही चार-चार वेळा कांद्याची रोपे टाकली, दर आठवड्याला फवारणी केली तरीही रोपे चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार आहे. सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. अनेक शेतकºयांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकल्यामुळे यंदा कांदा लागवडीला उशीर होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून, कधी कडक ऊन तर कधी ढग दाटून येत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. अवकाळी पावसाचे सावट असल्याने पिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा