चौकट-
आंब्याचे दर (किलो) होलसेल किरकाेळ
हापूस (रत्नागिरी) १८० २००
हापूस (कर्नाटक) १२० १५०
केशर १०० १२०
बदाम ६० ८०
लालबाग ६० ८०
दशेरी ७० १००
चौकट-
आवक वाढली ग्राहक समाधानकारक
नाशिक बाजार समितीमध्ये आंब्याची चांगली आवक होत आहे. त्याला दरही बऱ्यापैकी मिळत असून, ग्राहकांकडून आंब्याला चांगली मागणी असली, तरी लॉकडाऊनमुळे विक्रेत्यांना दुकाने लावण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने, ग्राहकांची सख्या मात्र काही प्रमाणात रोडावली असल्याचे दिसते. अक्षय तृतीयेनिमित्त लागणाऱ्या आंब्याची खरेदी ग्राहकांनी दोन दिवसांपूर्वीच केली असली, तरी त्यानंतर सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट-
या वर्षी ग्राहकांकडून आंब्याला चांगली मागणी आहे, पण लॉकडाऊनमुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षीप्रमाणेच या वर्षी अंब्याच्या सिजनवर कोरोनाचे सावट पसरलेले आहे.
- गणेश कर्पे, फळविक्रेता
कोट -
अक्षय तृतीयेसाठी लागणाऱ्या अंब्यांची ग्राहकांनी एक-दोन दिवसांपूर्वीच खरेदी केलेली असल्यामुळे किमाण सणाचे काम झाले आहे. मात्र, आता नाशिकमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने पुढील काही दिवसांत अंब्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-संदीप पाटील, विक्रेता
कोट -
यंदा आंब्याचे उत्पादन चांगले आहे. आमचा जवळपास ७५ टक्के माला निर्यात झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आंब्याला दरही चांगला मिळाला आहे.
- रत्नागर गवळी, शेतकरी
कोट-
यंदा आंब्याचे उत्पादन चांगले आले आहे. दर बऱ्यापैकी मिळत असला, तरी लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे आंबाविक्रीस काहींना अडचणी येत आहेत. अनेक वेळा मनासारखा भाव मिळत नाही.
- कृष्णा गावंडे शेतकरी