शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे यंदा टिपऱ्यांचा खणखणाट फिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:29 IST

नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही बाजारातील उत्सवाची रौनक फिकी पडली आहे. विशेष म्हणजे या नियमांचा फटका नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिराच्या पारंपरिक यात्रेलाही बसल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्यामुळे नवरात्रोत्सवाचा रंगच फिका

ग्रामदेवतेच्या यात्रेलाही फटका : नवरात्र मंडळांची संख्या घटली

 

नाशिक : डीजे वाजविण्यावर निर्बंध, रस्त्यावर मंडपाला मज्जाव, रात्री दहा वाजेनंतर गरबा, टिपºयांवर बंदी अशा एक नव्हे तर अनेक जाचक नियम व अटी महापालिका, पोलीस यंत्रणेने घातल्यामुळे यंदा शहरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या कमालीची घटली असून, उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही बाजारातील उत्सवाची रौनक फिकी पडली आहे. विशेष म्हणजे या नियमांचा फटका नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिराच्या पारंपरिक यात्रेलाही बसल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे अंगुलीनिर्देश करून गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रोत्सवालाही कायद्यात करकचून आवळून टाकले असून, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे मंडप उभारणीस मज्जाव, रस्त्याच्या एकतृतीयांश जागेतच मंडपाची उभारणी, मंडप उभारणीसाठी जागा मालक, महापालिका, पोलिसांची अनुमती, धर्मदाय आयुक्तांकडे मंडळांची नोंदणी, अग्निशामक दलाची ना हरकत अशा सुमारे वीस प्रकारच्या विविध जाचक अटी नियमांमध्ये नवरात्रोत्सव बांधून टाकला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शासकीय अनुमती घेताना नाकीनव आलेल्या सार्वजनिक मंडळांनी यंदापासून नवरात्रोत्सव साजरा न करता नियम, अटींच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी ‘घट’ विसर्जनाचा अंतिम निर्णय घेऊन टाकला आहे.त्यामुळे एरव्ही दरवर्षी मंतरलेल्या नऊ दिवसांत चौकाचौकात मध्यरात्री पर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर थिरकणाºया पावलांसह टिपºयांचा होणाºया खणखणाटाला मुकणार आहे. तपासणी पथकाची नियुक्तीनवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे, संस्थांकडून उभारण्यात येणारे मंडप, पेंडाल नियमानुसार आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाशिक शहर व ग्रामीण भागासाठी तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. नाशिक शहरासाठी प्रांत अधिकारी व महापालिकेच्या सहायक आयुक्त, विभागीय अधिकारी तसेच सहायक पोलीस आयुक्त यांची तर मालेगाव महापालिका क्षेत्रासाठी प्रांत अधिकारी, मनपा उपायुक्त यांची तर ग्रामीण भागासाठी ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना मंडळांनी उभारलेल्या मंडपाबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. कालिका यात्रा फिकीदरवर्षी नवरात्रोत्सवात गजबजणारी कालिका देवी यात्रा यंदा पोलीस व महापालिकेच्या जाचक कायद्यामुळे फिकी पडली आहे. एरव्ही दरवर्षी पितृपक्षापासूनच जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील कालिका मंदिराच्या दुतर्फा विक्रेते, व्यावसायिकांची दुकाने थाटण्यास सुरुवात होत, स्थानिक व परजिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक या यात्रेच्या निमित्ताने दहा दिवस चांगला व्यवसाय करीत तर नाशिककरांनाही या यात्रेचे विशेष आकर्षण असल्यामुळे ग्रामदेवतेच्या या यात्रेला वेगळेच महत्त्व प्राप्त होत होते.गेल्या वर्षी पोलिसांनी रस्त्यावर दुकाने थाटण्यास विरोध केल्याने अखेर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करून ऐनवेळी व्यावसायिकांना दुकाने मांडण्यास अनुमती देण्यात आली. यंदा मात्र कालिका यात्रेच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्यामुळे नवरात्रोत्सवाचा रंगच फिका पडला आहे.