शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा डिजिटल पर्युषण पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 01:12 IST

ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चतुर्मास सुरू झाल्यावर केवळ मोजक्या साधुमुनींच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत, तर दुसरीकडे दिगंबर जैन युवा महासभेच्या वतीने यंदा डिजिटल पर्युषण पर्वाची सुविधा देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनवे माध्यम : दहादिवसीय उपक्रम; दैनंदिन कार्यक्रम कायम

पंचवटी : ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चतुर्मास सुरू झाल्यावर केवळ मोजक्या साधुमुनींच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत, तर दुसरीकडे दिगंबर जैन युवा महासभेच्या वतीने यंदा डिजिटल पर्युषण पर्वाची सुविधा देण्यात येणार आहे.कोरोनामुळे भाविकांना झूमद्वारे चतुर्मास कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. म्हसरूळ येथील गजपंथ मंदिरात सहा ते सात जैनमुनी असून, त्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सध्या गजपंथ येथे मुनीजी जयदीदी महाराज, आचार्य कुमोदनंदीजी महाराज, आचार्य रवींद्रनंदीजी महाराज हे लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपासून मंदिरात अडकून आहेत. चतुर्मास काळात विहार करता येत नसल्याने ते दिवाळीपर्यंत गजपंथ येथे थांबणार आहेत. साधुमुनीविहार करताना जैनमंदिरात थांबतात.गजपंथ येथे मार्च महिन्यातमुनीजी, आचार्य थांबले होते,मात्र त्याचदरम्यान कोरोना संसर्ग वाढला व लॉकडाऊनमुळे ते गजपंथ येथून जाऊ शकले नाहीत.नाशिकरोड येथील जैनभवनात कोरोनामुळे पर्युषण पर्वात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याचे जैनस्थानकवासीयांनी सांगितले, तर सिडकोतील राणा प्रताप चौकात असलेल्या श्री वर्धमान जैनस्थानकातदेखील यंदा जाहीरपणे साधुमुनींचे प्रवचन होणार नसून, भीष्मपितामह तपस्वी रत्नगुरुदेव सुमतिप्रकाश म. सा. यांच्या शिष्या विशुद्धीजी म. सा. यांचे धार्मिक प्रवचनाचे रेकॉर्डिंग करून ते समाजबांधवांच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.चतुर्मासात येणाऱ्या जैन मुनींबाबत भाविकांना उत्सुकता असते. त्यांचे मार्गदर्शन आणि संत सहवास हा फार मोठा ठेवा मानला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे अशा उपक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कार्यक्रम होणारच नसले त्यावरदेखील पर्याय शोधण्यात आले आहेत.भारत वर्ष दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र प्रांतच्या पुढाकाराने हा डिजिटल पर्युषण पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चतुर्मास कालावधीत सलग दहा दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू असून, बाराशे भाविकांनीनोंदणी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम