शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:14 IST

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी ...

ठळक मुद्दे४३० कुटुंबांचे स्थलांतर महिनाअखेर ताबा जलसंपदा विभागाकडे

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले.परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रुपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमिनीवर असलेली पिके, घर, गोठ्यांचेही मूल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादित करण्यात आली. परंतु पुनर्वसनाच्या प्रश्नी काम धीम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पूर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनर्वसनासाठी धरणाच्या बाजूलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादित करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणाºया खर्चातही दरवर्षी वाढ होत होती. ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे.प्रोत्साहन अनुदानजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.नाशिकला पाणी मिळण्याविषयी साशंकतासाधारणत: २.६० टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या भाम धरणातील पाणी दारणा धरणातून नांदूरमधमेश्वरमार्गे नगर व मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे. नाशिक शहराला या पाण्याचा लाभ होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असली तरी, जनभावना लक्षात घेता जलसंपदा विभाग नाशिक जिल्ह्याला या धरणातून पाणी मिळेल असा दावा करीत असून, नेमके किती व कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट झालेले नाही.