शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

येवल्यात इच्छुकांना लागले निवडणुकीचे वेध

By admin | Updated: October 8, 2016 00:31 IST

नगराध्यक्ष : आरक्षण सोडतीमुळे कट्ट्यावर चर्चेला उधाण

 येवला : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत राज्य शासनाने स्वीकारलेली द्विसदस्यीय प्रभागपद्धती या पार्श्वभूमीवर येवला नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने विविध पक्षांचे नेमके उमेदवार कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.बुधवारी (दि. ५) मुंबई येथे झालेल्या राज्यातील सर्व नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत येवला नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने प्रतीक्षेत असलेले विविध पक्षांतील सर्वच इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहे. यावेळच्या निवडणुकीत मातब्बरांसह अनेक नवीन चेहरे रिंगणात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या पालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादीकडून जनतेच्या चर्चेत असणाऱ्या उमेदवारांत विद्यमान नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, उपनगराध्यक्ष पंकज पारख, माजी नगराध्यक्ष नीलेश पटेल, राजेश भांडगे, हुसेन शेख, रिजवान शेख, दत्ता निकम, रौफ शेख, तर भाजपाकडून प्रमोद सस्कर, धनंजय कुलकर्णी, विद्यमान नगरसेवक बंडू क्षीरसागर, सुनील काबरा, आनंद शिंदे, मनोज दिवटे, संजय कुक्कर, सुशीलभाई गुजराथी, शिवसेनेकडून जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, शहर शिवसेनाप्रमुख राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष रामदास पहिलवान दराडे, नगरसेवक संजय कासार, सुरज पटणी, प्रज्वल पटेल तसेच राष्ट्रीय काँग्रेसकडून राजेश भंडारी, सुरेश गोंधळी, नानासाहेब शिंदे, तर मनसेकडून डॉ. राजेश पटेल, सुयोग गायकवाड, रितेश बुब आदिंच्या नावाची चर्चा असून, नगरसेवक पद्माताई शिंदे, पैठणी उद्योजक बाळासाहेब कापसे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, मनोहर जावळे, आलमगीर शेख, एजाज शेख हे कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन मैदानात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा तालुक्यातील प्रमुख पाच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवून आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणायचा चंग बांधला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी निघाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत येणार आहेत. शिवाय कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता अध्यक्षपदाची उमेदवारी करण्याच्या विचारात नवयुवकांची फळी आहे. यापूर्वी येवल्यात तीनवेळा जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला आहे. परंतु त्यावेळी उमेदवारांची गर्दीही जास्त होती. तीच गर्दी याही वेळी होती की काय, याचे चित्र निवडणूक कार्यक्र म जाहीर झाल्यानंतरच दिसून येणार आहे.सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा दावा केला असल्याने पाच राजकीय पक्षांसह स्वतंत्र उमेदवार अशी आठ ते दहा उमेदवारांची संख्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसाधारण गटासाठी खुल्या झालेल्या नगराध्यक्षपदामुळे बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पालिका वर्तुळातील उमेदवाराचे डोळे नगराध्यक्षपदाकडे लागले आहेत. येवल्यात तीनवेळा जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला आहे. १९७८ साली स्वर्गीय प्रभाकर दादा कासार यांनी तत्कालीन नांगरधारी शेतकरी घेऊन झेंडा फडकावला होता. सन २००१च्या निवडणुकीत भाजपाची तत्कालीनअंतर्गत दुफळीसह स्वत:चा झेंडा घेऊन मैदानात नऊ उमेदवार उतरले होते आणि हुसेन शेख यांनी आकड्यांच्या विभाजनाच्या गणितात अपक्ष उमेदवारी करून बाजी मारत आपला ‘पतंग’ आकाशात उडवला व सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हुसेन शेख यांच्यावर जानेवारी २००६ मध्ये अविश्वासाचा ठराव पास होऊन त्यांना पायउतार व्हावे लागले होते. यामुळे एप्रिल २००६ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या सहा महिन्याच्या पोटनिवडणुकीत पंकज पारख यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी खुले आहे. संभाजीराजे पवार, नरेंद्र दराडे यांनी सेनेचा भगवा झेंडा हाती धरला आहे. माणिकराव शिंदे यांच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा, तर भाजपाचे नवीन शहराध्यक्ष आनंद शिंदे, कॉँग्रेस शहराध्यक्ष राजेश भंडारी, मनसेचे डॉ. राजेश पटेल यांची भूमिका, याशिवाय अपक्षाचा झेंडा कोण हाती घेतो यावर नगराध्यक्षपदाच्या लढतीची रंगत येणार आहे. येवला पालिकेच्या १२ प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या शनिवारपर्यंत (दि. १५) प्रसिद्ध होणार आहेत. (वार्ताहर)