मनमाड : येथुन जवळच असलेल्या नागापूर येथील शेकडो वर्ष पुरातन असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात भरणारी यात्रा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे मंदिर समितीद्वारे रद्द करण्यात आली. त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट बघायला मिळाला.दर वर्षी हजारो भाविक या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण महिनाभर यात्रा भरत असते. नागेश्वर महादेव मंदिर हे शेकडो वर्ष पुरातन असून जागृत देवस्थान आहे. मंदिराच्या शेजारी एक कुंड असुन मंदिरामध्ये पिंडी जवळ सतत पाणी भरलेले असते.(फोटो २७ मनमाड)नागापूर येथील प्राचीन नागेश्वर मंदिर.
नागेश्वर मंदिरातील यात्रा कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:36 IST