यळकोट यळकोट जय मल्हार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:58 AM2019-12-03T01:58:02+5:302019-12-03T01:58:23+5:30

‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

 Yalkot Yalkot Jai Malhar! | यळकोट यळकोट जय मल्हार !

यळकोट यळकोट जय मल्हार !

googlenewsNext

पंचवटी : ‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री वाघ्या-मुरळीच्या उपस्थितीत जागरण गोंधळ कार्यक्रम झाला.
हिरावाडीत (शक्तीनगर) शिवमल्हार मित्रमंडळातर्फे चंपाषष्ठीनिमित्त सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. गेल्या बुधवारपासून खंडेराव षडरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. षडरात्रोत्सव कुलधर्म-कुलाचार झाल्यावर समारोप करत सोमवारी सकाळी खंडेराव पूजन, अभिषेक, आरती करत उत्सवाला सुरुवात झाली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध प्रतिपदा षष्ठी कालावधीत देवाचा नवरात्रोत्सव असतो. षष्ठीला चंपाषष्ठी असल्याने यात्रा भरते. सायंकाळी गणेश आंबेकर यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष उदय गांगुर्डे, दिगंबर मोगरे, मोहित भडांगे, पवन बागुल, नितीन अहिरे, शुभम पवार, सुनील भुतेकर, सागर नेन्हे, पद्माकर भोईर, गणेश लोणारे, कांतीभाई परमार, आशितोष चव्हाण आदींसह शिवमल्हार मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अमृतधाम विडी कामगारनगर, शिवाजी चौकात श्रीमंत खंडेराव महाराज देवस्थानतर्फे चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. चंपाषष्ठीनिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

Web Title:  Yalkot Yalkot Jai Malhar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.