शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीत निवेदन लिहून द्या, आमदार विक्रम काळेंचा खोचक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:03 IST

होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेत ११९ गुणांची अट घातलेली आहे. ही अट कशासाठी असा सवाल खासदार  हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत उपस्थित करावा,यासाठी या विषयांशी संबंधिक प्रश्नांचे निवेदन होमिओपॅथी काउंसीलन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीमध्ये लिहून द्यावे, म्हणजे त्यांना केंद्रातील संबधितांसमोर होमिओपॅथीचे प्रश्न मांडता येतील असा खोचक सल्ला आमदार डॉ. विक्रम काळे यांनी होमिओपॅथी कौउंसीलचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांना दिला.

ठळक मुद्देहरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीत निवेदन लिहून द्या मी मुंबई विद्यापीठातून इंग्रजीचा पदवीधर आमदार डॉ.विक्रम काळे, खासदार हऱिश्चंद्र चव्हाण यांच्यात रंगला कलगी तुरा

नाशिक -होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेत ११९ गुणांची अट घातलेली आहे. ही अट कशासाठी असा सवाल खासदार  हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत उपस्थित करावा,यासाठी या विषयांशी संबंधिक प्रश्नांचे निवेदन होमिओपॅथी काउंसीलन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीमध्ये लिहून द्यावे, म्हणजे त्यांना केंद्रातील संबधितांसमोर होमिओपॅथीचे प्रश्न मांडता येतील असा खोचक सल्ला आमदार विक्रम काळे यांनी होमिओपॅथी कौउंसीलचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांना दिला.महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांच्यातर्फे सोमवारी (दि. १९) राज्यस्तरीय चर्चाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या चर्चाचसत्राचे उद्घाटन महाराष्ट्रा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांनी केले. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, डॉ. धनाजी बागल, डॉ.अरुण भस्मे,डॉ. शांतीलाल देसरडा, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे आदि उपस्थित होते. याउद्घाटन सोहळयात बोलताना विक्रम काळे यांनी काढलेल्या चिमट्यांना  प्रत्युत्तर देताना आपण मुंबई विद्याथ्यापीठातून पदव्युत्तर पदवी इंग्रजीमधून गेतली असून मराठी सह देशातील चार भाषा आपण बोलू शकतो त्यामुळे होमिओपॅथीचे प्रश्न कोणत्याही भाषेत मांडू शकतो असे सांगत होमिओपॅथी शाखेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले. दरम्यान, लोकसभेत हिंदी अथवा इंग्रजीत प्रश्न मांडल्यास तो संबंधितांच्याही लक्षात येईल, त्यामुळे डॉ. भालचंद्र ठाकरे यांनी चव्हाण यांना अ‍ॅलोपॅथीच्या प्रश्नांविषयीचे निवेदन इंग्रजीतून लिहून द्यावे अशी कोपरखिळी आमदार विक्रम काळे यांनी लगावली होती. त्यावर आपण मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी इंग्रजीमधूनच घेतली असून मराठीसह देशातील चार भाषा आपल्याला चांगल्या बोलता येतात. त्यामुळे आपण कोणत्याही भाषेत होमिओपॅथी डॉक्टरांची बाजू सरकार दरबारी मांडू शकतो असे सांगत अ‍ॅलोपॅथीच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिले. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री दिपक सावंत  स्वत:  होमिओपॅथीचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे होमिओपॅथी परिषदेने आपल्या मागण्या त्यांच्यासमोरही मांडल्या असे आवाहन हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. मात्र होमिओप्रथीचे तज्ज्ञ आरोग्य मंत्री असून होमिओपॅथी शाखेच्या अडचणी कमी होत नसल्याच खंत डॉ. अरुण भस्मे यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विलास कांगणे  यांनी केले. डॉ. नितीन गावडे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयNashikनाशिकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणVikram Kaleविक्रम काळेuniversityविद्यापीठ