दिंडोरी : तालुक्यातील विळवंडी येथे मंगळवारी सकाळी बिबट्याने मंजुळाबाई सुखदेव धामोडे (६५) या वृद्ध महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही बिबट्या विळवंडी शिवारात झुडपात लपून बसला आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी शोध घेत आहे. मंजुळाबाई धामोडे यांचा पिंप्रज रस्त्यावर मळा आहे. त्या सकाळी मळ्यात काम करत असताना पाठिमागून येऊन बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. बिबट्या येताच कुत्र्यांचे भूंकणे जोरात ऐकू येऊ लागल्याने घरातील नागरिक बाहेर आले. गर्दी बघताच बिबट्याने धूम ठोकली. सध्या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्यात वृद्धा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:06 IST