शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर ‘व्होटिंग सेल्फी’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:40 IST

नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करीत नेटिझन्सने मतदानाचा हक्क मोठ्या अभिमानाने ...

नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करीत नेटिझन्सने मतदानाचा हक्क मोठ्या अभिमानाने मिरविला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या ग्रुपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई लागल्याचे छायाचित्र डीपीदेखील ठेवले. लोकशाहीचा हक्क आणि सामाजिक कर्तव्याचे भान राखत काढलेल्या सेल्फीमुळे सोशल मीडियावर अशा छायाचित्रांचा अक्षरश: पाऊस पडला.लोकशाही निवडणूक प्रचाराचा अपेक्षित ज्वर दिसला नसला तरी मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी सकाळी मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांनी मतदानानंतर सेल्फी काढत सर्वात अगोदर मतदानाचा हक्क बजावल्याचे सेल्फी आपल्या आप्तस्वकीयांना पाठविले. सोशल मीडियावर अशा प्रकारचे छायाचित्र अपलोड झाल्यानंतर एकेक करीत असंख्य छायाचित्रांचा पाऊस सोशल मीडियावर पडला. बोटाला शाई लावल्याचे छायाचित्र दाखवित ‘मी मतनाचा हक्क बजावला, आपणही बजवा’ असे संदेशही अनेकांनी पाठविले. ‘इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा, असे (शाई लावलेले) बोट दाखविणे केव्हाही चांगले’, ‘बोटं मोडू नका, बोटं दाखवा’ अशा प्रकारचे प्रबोधनपर संदेश आपल्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर टाकण्यात आले होते.कुणी वैयक्तिक तर कुणी ग्रुपमध्ये सेल्फी काढून आपापल्या मित्रांना मतदानाचे छायाचित्र शेअर केले, तर असंख्य जोडप्यांनी जोडीने सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. मतदान केंद्राबाहेर, पोलिंग बूथ तसेच मतदान केंद्रावरील रस्त्यावर सेल्फी काढत लोकशाही उत्सवाचे नाशिककर साक्षीदार झाले. केवळ सेल्फीचा आनंद न घेता मतदान करण्याचे साकडेही एकमेकांना घालण्यात आले. केवळ नाशिक शहरात हा सेल्फी उत्सव सुरू होता असे नाही तर इतर शहरात असलेल्या अनेकांनी त्यांचे तेथील मतदानाचे सेल्फी शेअर केले.व्हॉट्स अ‍ॅप डीपी आणि मतदानमतदानानंतर बोटाला शाई लावलेले छायाचित्राचे सेल्फी ठेवून लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असल्याचे दाखवून दिले. व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलसह अनेकांचे स्टेटसही आज निवडणुकीशी संबंधित होते. एकमेकांच्या वेटिंग सेल्फीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. प्रथम मतदान करणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला सोशल मीडियाची चांगलीच साथ लाभली. प्रथम मत देणाऱ्यांनी आपले फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अपलोड केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकSelfieसेल्फी