मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील पूजा देसाई हिने सलग आठ तासांत ५६ मुलींचा मेकअप करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम करून नाव झळकावणे हे अनेकांचे स्वप्न आहे. स्वप्न साध्य करण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते करण्यास अनेकजण उत्सुक असून, सतत प्रयत्नशील असतात.झोडगे येथील पूजा देसाई हिने असाच विक्रम नवसारी (गुजरात) येथे केला. सलग आठ तासात ५६ मुलींचा मेकअप करीत गिनीज बुकमध्ये नाव नोंदविले आहे. नवसारी जिल्ह्यातील विजलपूर शहरातील पूजा देसाई यांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कठोर सराव करून ३१ महिलांच्या मेकअप करण्याचा विक्रम मोडला आहे. तथापि, गिनीज बुकच्या अधिकारी यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हा विक्रम निश्चित मानला जाईल.
झोडगे येथील पूजा बनली मेकअप क्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:28 IST