शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रग्रहणातही करता येईल वटपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:44 IST

नाशिक: येत्या शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसल्याने त्या दिवशी सुहासिनींना वटपूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक: येत्या शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसल्याने त्या दिवशी सुहासिनींना वटपूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.शुक्रवारी मांद्य छायाकल्प चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी वटपौर्णिमा आहे. ग्रहण काळात वटपूजन करावे किंवा याबाबत महिलावर्गात संभ्रम आहे. त्या पार्श्वभूमीवर दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी याबाबत म्हटले आहे, शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमेस चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसून ते छायाकल्प ग्रहण आहे. त्यामुळे या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजाअर्चा, कुळधर्म, कुळाचार पार पाडता येतील.दरम्यान, यंदा वटपूजनावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नसला तरी कोरोनाचे सावट मात्र कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी घोषित केलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे सुहासिनींना वटपूजनावेळी फिजिकल डिस्टन्सिंग अनिवार्य असणार आहे. त्यातही सरकारने धार्मिक सण-उत्सव यासाठी एकत्र येण्यास मनाई केलेली असल्याने यंदा वटपौर्णिमेसाठी सुवासिनीही घराबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे.कोरोनामुळे सुवासिनींनी घराबाहेर न पडता प्रत्यक्ष वटपूजना-ऐवजी यंदा वडाचे चित्र काढून घरातच पूजन करावे. शुक्रवारी माध्यान्हापर्यंत दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत घरी वटपूजन करता येईल, असेही मोहनराव दाते यांनी म्हटले आहे.--------------------------------पर्यावरण दिन अन् वटपूजनशहरात रस्ता रुंदीकरणात अनेक भागातील वटवृक्ष तोडले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी सुवासिनींना वटवृक्ष शोधण्यासाठी पायपीट करावी लागत असते. त्यातही वटवृक्षांना धागे गुंडाळल्याने त्याला हानी पोहोचते, असा वृक्षप्रेमींचा दावा असल्याने वटपौर्णिमेला त्याबाबत जनजागृतीही केली जात असते. बऱ्याच विवाहिता वडाच्या फांदद्या तोडून आणत घरी वटपूजन करत असतात. त्यालाही वृक्षप्रेमींकडून हरकत घेतली जात असते. यंदा मात्र, वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन एकाच दिवशी येत आहे. त्यात कोरोनाचे संकट असल्याने बव्हंशी सुवासिनींकडून घरच्या घरीच वटपूजन केले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा खºया अर्थाने वृक्षसंवर्धन होऊन पर्यावरण दिन साजरा होणार असल्याचे वृक्षप्रेमींकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक