शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जगाच्या कल्याणा संतांची विभूती : धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:18 IST

संत हे चंदनासारखे असतात. चंदन हे स्वत: झिजते व दुसऱ्यांना सुगंध देते, तसे संत स्वत: झिजतात आणि जगाचे कल्याण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष कीर्तनकेसरी संजय धोंडगे यांनी केले.

सिडको : संत हे चंदनासारखे असतात. चंदन हे स्वत: झिजते व दुसऱ्यांना सुगंध देते, तसे संत स्वत: झिजतात आणि जगाचे कल्याण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष कीर्तनकेसरी संजय धोंडगे यांनी केले. राजे संभाजी स्टेडियम नाशिक येथे विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यांतर्गत राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करताना धोंगडे बोलत होते. कार्यक्र मास रामायणाचार्य रामराव ढोक, शिवाजी चुंभळे, मुरलीधर पाटील, कावेरी घुगे, नगरेसवक कल्पना चुंभळे, डॉ. धनश्री दास, रत्नाकर चुंबळे, आदी उपस्थित होते. कीर्तनकेसरी धोंडगे महाराज पुढे म्हणाले, चंदन तापनाशक आहे, तर संत त्रिविदा ताप घालवितात. संत हे दुर्जनालाही सज्जन बनवितात. संतांचा महिमा सांगण्यासाठी चंदन, परीस, साखर, दिव्याचा दृष्टांत सांगितला जात आहे.  चंदनाचे हात पायही चंदन ! परिसा नाही हीन कोणी अंग !! दीपा नाही पाटी पोटी अंधकार ! सर्वांगी साखर अवघी गोड !! तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुन मिळेविना !! सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीन चरणांचा अभंगही यावेळी कीर्तनकार घोंगडे महाराज यांनी सांगितला.  यावेळी दररोज सुरू असलेल्या पतंजली प्राणायाम व योग शिबिर योगाचार्य गोकुळ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक तथा स्थायी समितीच्या सदस्य पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कीर्तन महोत्सवाचे कार्याध्यक्ष गोविंद घुगे व स्मिता शिंदे, रामनाथ गंभीरे, योगीनाथ पवार, मधुकर आवारे, सुभाष वाणी, शरद पेढेकर, बाळासाहेब शेळके आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

टॅग्स :Nashikनाशिक