शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्पर्धेत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:42 IST

‘विकीपिडीया’च्या राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले खरोटे यांनी टिपलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला

नाशिक : ‘विकीपिडीया’च्या राष्टÑीय-आंतरराष्टÑीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले खरोटे यांनी टिपलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, आंतरराष्टÑीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला.  गेल्या सप्टेंबर महिन्यात विकीपिडीयाच्या वतीने ‘वास्तू’ संकल्पना निश्चित करून ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतातून ही टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली. या फेरीमध्ये जगभरातील ४५पेक्षा अधिक देशांमधून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक छायाचित्रे स्पर्धेत होती. या फेरीमध्येही खरोटे यांच्या सदर छायाचित्राने परीक्षकांच्या  समूहाचे लक्ष वेधून घेत बाजी मारली. एकूणच खंडोबारायाच्या जेजुरीमधील चंपाषष्ठी उत्सवाचा जागतिक स्तरावर जयजयकार झाला आहे.  चंपाषष्ठी उत्सवाचे टिपलेले विजयी छायाचित्र हे तांत्रिकदृष्ट्या कसोटीवर खरे उतरले; मात्र छायाचित्राने सांगितलेला उत्सव व भाविकांचा दिसणारा आनंद परीक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. राष्टÑीय स्तरावरील टॉप-१०मध्ये प्रथम क्र मांक मिळविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घोडदौड कायम ठेवत प्रथम क्र मांक पटकाविणे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे विकीपिडीयाचे भारताकडून स्पर्धेचे संयोजन करणारे प्रमुख संयोजक सुयश द्विवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्टÑीय पातळीवर परीक्षकांच्या समूहात विकीपिडीयाचे सुयश द्विवेदी, स्वप्नील करंबळेकर, श्रेया द्विवेदी, भारतीय पुरातत्व विभागाचे मध्य प्रदेशचे सहायक संचालक यादव, नेहरू सायन्स सेंटरचे सेवानिवृत्त अधिकारी व्ही. व्ही. रायगावकर यांचा समावेश होता. सहा वर्षांनंतर पुन्हा भारताची बाजीविकीपिडीयाच्या वतीने दरवर्षी सदर स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्टÑीय फेरीसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यापूर्वी २०१२ मध्ये आंतरराष्टÑीय फेरीत भारताकडून पाठविलेल्या दहा छायाचित्रांपैकी एका छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला होता तर दुसरे छायाचित्र टॉप-१०मध्ये राहिले होते. त्यानंतर सहा वर्षांनी यंदा २०१७च्या स्पर्धेत पाठविलेल्या टॉप-१०मधील छायाचित्रांमध्ये खरोटे यांचे एकमेव छायाचित्र विजयी ठरले.