लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक कार्यक्र मांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा केला.महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, जयवंत गारे, डॉ. जगदीश चौरे, काशीनाथ बागुल, एस. टी. बागुल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र मास डी. एम. गायकवाड, ज्ञानदेव पवार, के. के. गांगुर्डे, भरत चव्हाण, संजय खिल्लारी, प्रभाकर बागुल, शांताराम बागुल, नामदेव थैल, सुरेश ढुमसे, सुर्यभान पवार, सुनील पवार, तुळशीराम पवार, सुभाष राऊत, कांतीलाल राऊत, पंकज गायकवाड, पंकज बागुल, दीपक थैल, रामू महाजन, भगवान खिल्लारी, गंगाराम भोये, नामदेव पवार, बाळा भोये, एन. डी. भोये, हरिश्चंद्र भोये, रमेश भोये, काशीनाथ जोपळे, सोमनाथ सोनवणे, राजू पाटील आदी उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरणासाठी चणकापूर येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी केली आहे. १९३० च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना आमदार नितीन पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, कळवण तालुका आदिवासी संघर्ष समिती आणि विविध आदिवासी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा, चणकापूर, नांदुरी, वंजारी, अंबिका ओझर, साकोरे, आठंबे, इन्शी आदी गावात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
कळवण तालुक्यात जागतिक आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:16 IST
कळवण : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक कार्यक्र मांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा केला.
कळवण तालुक्यात जागतिक आदिवासी दिन
ठळक मुद्देचणकापूर येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी केली आहे.