शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंचे विश्व भीष्मराज बाम :  अंजली भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:15 IST

खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्टÑीय नेमबाजपटू अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

नाशिक : खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्टय नेमबाजपटू अंजली भागवत यांनी व्यक्त केले. निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अंजली भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, संजीव लाटकर, अशोक कोठावळे, अभिजित बाम उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी बाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, बाम हे नेहमी आम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांनी माझ्यामध्ये अंतर्मनाविरुद्ध कृती करण्याचे धाडस निर्माण केले. आंतरराष्टÑीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचे सोने क रता येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते; मात्र त्यांचे मार्गदर्शन आणि ‘टिप्स’मुळे हे शक्य झाले. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. एकाग्रता, आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा हे बाम यांच्याकडून शिकायला मिळाले. बाम यांचा आवाज आमचा विश्वास होता. गुरू म्हणजे विश्वास असतो आणि त्यांच्या ‘टिप्स’वर विश्वास दाखविला की मग जगही जिंकता येते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते बाम यांच्या मना सज्जना व मनोपासना या दोन पुस्तकांसह स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. धर्माधिकारी यांनीही मनोगतातून बाम यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक डॉ. भरत केळकर यांनी केले व सूत्रसंचालन वंदना अत्रे यांनी केले.‘बाम यांचे स्वप्न पूर्ण करूया’भीष्मराज बाम यांनी बघितलेले स्वप्न आपण सारे मिळून पूर्ण करूया, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेच. बाम यांनी भेट दिलेली साडी मी अजून जपून ठेवली असून, ती माझ्यासाठी अनमोल ठेवा असल्याचे अंजली भागवत यांनी यावेळी सांगितले. आॅलिम्पिकसाठी भारताचे प्रतिनिधित्व करताना बाम यांनी आमच्या सुरक्षिततेसाठी घरात यज्ञ केला होता, ते आजही माझ्या स्मरणात आहे.

 

टॅग्स :Sportsक्रीडा