सिडको : दरवर्षी जात प्रमाणपत्र पडताळणीची हजारो प्रकरणे नाशिक येथील कार्यालयात येतात. यातील अनेक प्रकरणे ही केवळ कागदपत्रांमधील त्रुटींमुळे होत असते. यावर उपाय म्हणून नाशिक विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांशी याबाबत संवाद साधून जात पडताळणीसाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे सादर करावीत याची माहिती देण्यात आली.दरवर्षीच जात प्रमाणपत्राबाबत विद्यार्थी नाराज असतात. जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचे कारण विद्यार्थी व पालक सांगत असले त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे कारण विद्यार्थी व पालक सांगत असले त्यासाठी जी कागदपत्रे द्यावी लागतात, त्यात अनेक तफावती असतात. जी कागदपत्र देणे गरजेचे आहे ती न देता इतर कागदपत्रच अर्जाला जोडलेली असतात. यामुळे संबंधित विभागात कामकाज करणाऱ्यांबरोबर विद्यार्थी व पालकांचीही चांगलीच तारांबळ उडते. यासाठी यंदाच्या वर्षी समितीचे अध्यक्ष संजय गौतम, उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या नेतृत्वाखाली नाशिक तसेच अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये समितीची प्रमुख टीम जाऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. गेल्या १२ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना समितीच्या अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे धडे देण्यात आले. या उपक्रमास महाविद्यालयातूनही सकारात्मक पाठिंबा मिळाला असल्याचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील यांनी सांगितले. सध्या विभागीय जात पडताळणी समितीचे अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन आॅनलाइन अर्ज कसा भरावा याबाबतही अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. या समितीत अध्यक्ष संजय गौतम, उपायुक्त राजेंद्र कलाल, खुशाल गायकवाड, शशिकांत पाटील, मनोज बेलदार आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
By admin | Updated: September 4, 2015 23:53 IST