नाशिक : असोसिएशन आॅफ नाशिक स्कूल्सच्या वतीने फ्रावशी अकॅडमीमध्ये नुकतीच ‘मल्टिपल इन्टेलिजन्स इन क्लासरूम’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. होरायझन अकॅडमी, फ्रावशी अकॅडमी, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल व बॉइज टाउन पब्लिक स्कूल या शाळांच्या शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. अडचणींवर मात करण्याच्या विषयावर इंग्लंड येथील मार्गारेट वॉर्नर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांच्या शंकांचेही निराकरण केले.
‘नाशिक स्कूल्स’च्या वतीने कार्यशाळा
By admin | Updated: October 20, 2014 00:08 IST