शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या दोन्ही शाखांत चालणार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:56 IST

शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या.

ठळक मुद्देजुन्या इमारतीतून कामकाज सुरू : अंधश्रद्धेमुळे काही विभागांचे स्थलांतर

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आर्थिक दृष्टचक्रात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या द्वारका येथील मुख्यालयातील काही विभागांचे जुना आग्रारोडवरील बॅँकेच्या जुन्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले असून, सोमवारपासून प्रत्यक्षात कामकाजालाही सुरुवात झाली आहे. बारा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत बांधलेल्या नवीन इमारतीतून पुन्हा जुन्या इमारतीतून कामकाज करण्याच्या बॅँकेच्या या निर्णयाबद्दल उलटसुलट चर्चा होत असून, अंधश्रद्धेला बळी पडूनच बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून या ठिकणाहून बॅँकेचे सर्व कामकाज केले जात असून, काही वार्षिक सर्वसाधारण सभादेखील घेण्यात आल्या आहेत. जुनी इमारत मात्र तशीच पडून असून, बॅँकेने एम्प्लायमेंट एक्सचेंज विभागाला तसेच अण्णासाहेब महामंडळाला भाडेतत्त्वावर काही जागा दिली होती. तथापि, नाबार्डने बॅँकेच्या या कृतीवर हरकत घेऊन बॅँकेची मालमत्ता भाड्याने देता येत नसल्याचे म्हटले. नवीन इमारतीत बॅँकेचा कारभार चालत असतानाच, काही प्रकरणांमध्ये बॅँकेच्या संचालकांची चौकशी करण्यात येऊन त्यांचे संचालकपदही रद्दची कारवाई करण्यात आली, त्याचबरोबर बॅँकेवर प्रशासकही नेमण्यात आले. नोटाबंदी व अन्य कारणांमुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावली, अशा एक नव्हे अनेक कारणांनी बॅँक अडचणीत आल्याने बॅँकेच्या वास्तुत दोष असल्याची व त्यामुळे बॅँकेचे पुन्हा जुन्या इमारतीतच स्थलांतर करण्याची चर्चा सुरू झाली. अशातच बॅँकेने अक्षय तृतीयेच्या दिवशी जुन्या इमारतीत सत्यनारायण पूजा केल्यामुळे या चर्चेला उधाण आले. अखेर रविवारी बॅँकेच्या सुटीच्या दिवशी नवीन इमारतीतून फर्निचर, टेबल, खुर्च्या, संगणक आदी साहित्य पुन्हा जुन्या इमारतीत आणण्यात येऊन सोमवारी कामकाजाला सुरुवात करण्यात आली. या संदर्भात बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बॅँकेच्या स्थलांतरास दुजोरा दिला असला तरी, नवीन इमारतीतूनही कामकाज चालणार असल्याचे सांगितले. जुन्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर बॅँकेला खर्च करावा लागत होता. त्यामुळे या वास्तुचा पुन्हा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आहेर म्हणाले.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक