शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

दिग्गज उमेदवारांची रॅलीशक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

 नाशिक : जिल्ह्यात विविध मतदारसंघात आज दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध पक्षांच्या उमेदवारांबरोबर अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. मालेगाव : येथील मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा निवडणुकीसाठी दिवसभरात आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघात ५ जणांचे ६ तर मध्य मतदारसंघात एका इच्छुकाच्या दोन अर्जांचा समावेश आहे. आज दिवसभरात बाह्य मतदारसंघातून चार उमेदवारांनी प्रत्येकी एक तर शिवसेनेचे विद्यमान आमदार दादा भुसे यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. मालेगाव मध्य मतदारसंघात रमेश मोरे यांनी बहूजन समाज पार्टीतर्फे दोन अर्ज दाखल केले आहेत तर तीन इच्छुकांनी सहा उमेदवारी अर्ज नेले आहेत. बाह्य मतदारसंघात आमदार दादा भुसे यांनी शिवसेना, नगरसेवक सुनील गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, व्यंकट कचवे यांनी बसपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. येवल्यात नऊ अर्ज दाखलयेवला: येवला विधानसभा मतदारसंघात ४ जणांनी ६ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ६ जणांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संभाजी साहेबराव पवार यांनी शिवसेनेच्या अर्जासह दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाजी माधवराव मानकर यांनी भाजपा व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पुष्पा अनिल बनसोडे, सुनील बन्सी घोडेराव या दोन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.आतापर्यंत ६९ जणांनी ११२ नामनिर्देशन पत्र घेतले आहे. शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी दिली.कळवणला आतापर्यंत ६२ नामांकन नेलेकळवण: कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इिच्छणार्या इच्छुक उमेदवारांनी सातव्या दिवशी वीस नामांकन अर्ज नेले असून सातव्या दिवसा अखेर ६२ नामाकन पत्र नेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कहाडोळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर पाटील , युवराज गांगुर्डे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नारायण गावित, तर बहुजन समाज पक्षाकडून गंगाराम गोविंदा गायकवाड, मिच्छंद्र चंद्रसेन अिहर शिवसेनेकडून भारत लक्ष्मण वाघमारे, व मोहन नवसू गांगुर्डे तर अपक्ष म्हणून पांडुरंग बयाजी कनोज, रोहिदास उत्तम धुळे तर रिपिब्लकन पार्टीकडून धर्मा भीमजी पवार यांनी नामांकन पत्र नेले. उमेदवारी सोबत असलेल्या प्रतिज्ञापत्रक व कागदपत्र यांची जमवाजमव करताना इच्छुक उमेदवार व समर्थक यांची चांगलीच दमछाक होत होताना दिसून येत होते.बागलाणमधून २१ अर्ज सटाणा : विधानसभा निवडनुकीसाठी बागलाणमधून बारा जणांनी एकवीस उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत बागलाणमधून विक्रमी अर्ज विक्री झाले. दाखल झालेल्यांमध्ये माजी आमदार दिलीप बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट गवळी, पोपट आहिरे , नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण, अलका माळी, साधना गवळी, भाविसंग गायकवाड, दीपिका चव्हाण, महेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले काल दिलीप बोरसे यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांसह तालुक्यातील बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या . या निवडणुकीत माजी आमदार चव्हाण त्यांच्या मातोश्री सुलोचना चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले तर त्यांच्या पत्नी दीपिका चव्हाण यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज भरला . इगतपुरी - त्र्यंबकेश्वरमधून सहा अर्ज घोटी : इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले.यात विद्यमान आमदारासह तीन इच्छुकांचा समावेश आहे. दरम्यान शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने अनेक इच्छुकांनी याच दिवशी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केल्याने विक्र मी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी कॉँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार निर्मला गावीत यांनी दोन, तर मनसेकडून प्रकाश लचके यांनी दोन तर संदीप जाधव व कमळू कडाळी यांनी प्रत्येकी एक असे सहा अर्ज दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र पवार यांनी दिली.दिंडोरीत ८ उमेदवारी अर्ज दाखलदिंडोरी : दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार नरहरी झिरवाळ, माजी समाजकल्याण सभापती वसंत वाघ, माकपचे दत्तू पाडवी यांच्यासह अन्य उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. शिवसेना व माकपने शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. माजी आमदार नरहरी झिरवाळ व वसंत वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. तर माकपच्या वतीने दत्तु पाडवी यांनी उमेदवारी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे देवराम गायकवाड- माकप, दशरथ चारोस्कर- राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, तानाजी माळेकर- संकल्पीत आरपीआय, धोंडीराम चारोस्कर- आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडीया आदि ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी अर्ज दाखल केला होता. चांदवडला १२ उमेदवारी अर्ज चांदवड : चांदवड -देवळा मतदार संघात आतापावेतो ८ व्यक्तींनी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात शुक्रवारी तीन जणांनी सहा उमेदवारी अर्ज भरले असून, विद्यमान आमदार शिरीष कोतवाल यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल केला अर्ज भरणाऱ्यांमध्ये अलका महेंद्र केदारे, डॉ.राहुल दौलत अहेर, डॉ.नवलकिशोर अण्णासाहेब शिंदे अशोक भिवाजी हिरे, भीमराव निरभवणे, डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे, तर आमदार शिरीषकुमार वसंतराव कोतवाल यांनी कॉँग्रेसचे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले, तर प्रवीण ठाकरे यांनी मनसेचा एक, तर अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले आहे. तर डॉ. राहुल दौलत अहेर असे अर्ज दाखल झाल्याने आठ व्यक्तींनी एकूण १२ अर्ज दाखल केल्याची माहिती प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख यांनी दिली. निफाडला कदम, बनकर यांचा अर्ज दाखलनिफाड : विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमदार अनिल कदम व राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप बनकर यांनी आज रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. निफाड शहरात पिंपळगाव रोडवर शिवसेनेच्या गाड्यांचा ताफा आला आणि शिवसैनिकांनी गर्दी केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यावर जोरदार घोषणायुद्ध सुरू झाले. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभांमध्ये कदम आणि बनकर यांनी आपापल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले.(वार्ताहर)